अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ डिसेंबर ते १५ डिसेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात
शुक्र, अष्टमात रवि, बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ,
नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
काहींना प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमनासाठीही हा काळ चांगला आहे. मात्र प्रवासात
काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं
कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे
योग संभवतात. काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. संपूर्ण सप्ताह धार्मिक
गोष्टींसाठी/ उपासनेसाठी अनुकुल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि ,
बुध, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि व्ययस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्बेतीची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू
शकतो. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ काढा.
सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत
भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कामात अचानक अडथळे किंवा त्रास संभवतो.
सप्ताहाच्या शेवटी काही चांगल्या व आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. संपूर्ण सप्ताहात
शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांशी विनाकारण वाद वाढवू नका.
मारुतीची उपासना फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि,
बुध, गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. घरच्यांबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी.
भागीदारीत व्यवसाय असणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी
घ्यावी. व्यवहार स्वच्छ ठेवावेत. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा फ़ॅटी लिव्हरचा त्रास असेल
त्यांनी आरोग्याची पूर्ण काळ्जी घ्यावी. अंगावर दुखणे काढू नका. वैद्यकीय सल्ला जरुर
घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरात शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महालक्ष्मीची
उपासना केल्यास मन शांत रहाण्यास मदत होईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि,
बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. सुरुवातीला तब्बेतीची काळजी घ्यावी. वादविवादात यश संभवते.
सप्ताह मध्यात जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय असणार्‍यांनी
भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा
पोटाचे विकार असतील त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. अति मसालेदार पदार्थ खाणे
टाळावेत. सप्ताहाचा शेवट काहींना भाग्यवर्धक आहे. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना
हा संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत शुक्र, चतुर्थात रवि, बुध, गुरु, पंचमात
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ, नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू
अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ
द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना विरोधी ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण
करु शकतो. ह्रदयविकार, रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. वकील व
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र हा अनुकुल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर
जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत रवि, बुध, गुरु,
चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू
आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ किंवा
पार्टीत सहभागी होण्याचे योग आहेत. गृह सजावटीसाठी वेळ काढाल. सप्ताहाचा मध्य
विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना
पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट जोडीदाराला चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी रवि, बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि
दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. घरात छानशा समारंभ किंवा
सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला आहे. घरातील काही दुरुस्तीची कामे प्रलंबीत
असतील तर आता त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. प्रवासात योग्य ती काळजी घ्या.
सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकुल काळ आहे मात्र यश मिळवण्यासाठी जास्त
प्रयत्न करावे लागतील. कमोडीटी, शेअर मार्केट किंवा तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक सध्या
नुकसानीची ठरु शकेल. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, धनस्थानी शनी,
प्लुटो, तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ, नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू
आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस काहींना धनलाभाची प्राप्ती होऊ शकेल मात्र वादाचे प्रसंग टाळावेत.
डोळ्यांचे किंवा दाताचे काही विकार असतील तर वेळीच उपचार करुन घ्यावेत. सप्ताह मध्यात
आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना प्रवासाचे
योग आहेत. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. घरातील वातावरण छान असेल.
प्रॉपर्टीच्या संबंधी कामे करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या
छंदासाठी जरुर वेळ द्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी केतू,
तृतिय स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी शुक्र आणि
व्ययस्थानी रवि, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. छान खरेदी होईल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल.
मन प्रसन्न असेल. प्रवासाचेही योग येऊ शकतात. घरातील वातावरण चांगले राहील.
प्रॉपर्टीपासून फ़ायदा संभवतो. नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर अनुकूल
काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी रवि, बुध, गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरूवात एखादा खर्च करायला लावणारी असेल. पायाची दुखणी असतील तर योग्य
ती काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवावे. वाहन चालवतांना पुरेशी काळजी घ्यावी. वाहनांची
कागदपत्रे जवळ बाळगावीत. कुटुंबीयांबरोबर वादाचे प्रसंग टाळावेत. कॉंप्यूटरवर जास्त वेळ काम
करणार्‍यांनी डोळ्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस
अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी रवि, बुध, गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो
आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल.
मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचे योग येतील. खिशात भरपूर पैसा
खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल.
परदेशगमनासाठी काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक घटना घडू शकतात.
काहींना धनलाभ होतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. मस्त पार्टी
करायला हरकत नाही.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
अष्टमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी रवि, बुध, गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी
केतू आणि व्ययस्थानी मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला बुधाचा हर्षलशी
षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. मात्र
आपल्या कार्यक्षेत्रातील कोणी हितशत्रू आपल्या विरोधात काही कारस्थानं तर करत नाही ना
याकडे लक्ष ठेवावे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात व्यवसायातील लोक
भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई
होऊ शकेल. मित्रमंडळींच्या भेटी घडू शकतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे
लागतील. सप्ताहाच्या शेवटी परदेशगमनासाठी अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या
गुंतवणूकीमधून फ़ायदा संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध