राशिभविष्य (२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र,
अष्टमात रवि, बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ, नेपचून अशी
ग्रहस्थिती असेल.  २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
२७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी.
वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या
जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. इंशूरन्सचे काम
करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे.
प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात.
विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि , बुध, गुरु,
अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी
ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग
होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत
नाही. उद्योग व्यवसायामध्ये विशेषत: भागीदारीच्या व्यवसायामध्ये चांगले काम होईल.
काहींना धनलाभ शक्य. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात.
प्रवासयोग येतील. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला
लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल
कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि, बुध,
गुरु,  सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी
ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग
होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी
घ्यावी लागणार आहे. तब्येतीच्या छोट्यामोठ्या कुरबुरी जाणवत राहू शकतील. नोकरीच्या
शोधात असणार्‍यांसाठी अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात छान पार्टी करायला हरकत
नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात योग्य ती काळजी
घ्यावी. सर्दी/ सायनसचा त्रास संभवतो. भावंडांशी वाद टाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि,  बुध,
गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात केतू,  अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात हर्षल अशी
ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग
होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. परदेश प्रवास
करण्यासाठी अनुकुल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना अनुकुल
काळ आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आपली काही आवड किंवा छंद असतील तर
त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. विद्यार्थी, कलाकार,
खेळाडू यांना अनुकुल काळ आहे. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत शुक्र, चतुर्थात रवि, बुध, गुरु,  पंचमात
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ,  नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी
ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
२७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या
भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्रीसाठी अनुकुल काळ
आहे. घरातील वातावरण प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला
छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनअपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक
गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत रवि, बुध, गुरु,  चतुर्थात
शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि
लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा
मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला
शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडे किंवा आप्तेष्ट भेटतील. आपल्या
आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने
वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल.
सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल.
सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी रवि, बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग
होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी
प्रतियोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना
करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत
किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना
बढतीचे योग शक्य आहेत.  सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा
नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस खाण्यापिण्याची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो,
तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ,  नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि
व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व बुधाचा
मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १ तारखेला
शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग मात्र टाळावी. जिवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत
राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान
अनुकुल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना
अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात
चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल
काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी केतू, तृतिय
स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी शुक्र आणि
व्ययस्थानी रवि, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व
बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि १
तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराला एखादी छानशी भॆटवस्तु देऊन खुश करा. काही अनपेक्षित
खर्चही करावे लागू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान प्रतिकूल आहे.
भागीदाराला गृहीत धरु नका. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन
शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा
ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा
प्रवासही घडू शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू,  धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  शुक्र आणि लाभस्थानी रवि, बुध,  गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व
बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि
१ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला अचानक मिळालेल्या भेटवस्तूंनी चकित व्हाल. काहींना प्रवासयोग
शक्य. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी.
सर्दी/ सायनसचा त्रास संभवतो. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ चांगला आहे.
सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. सप्ताह अखेरीस मात्र
रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी
आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी शुक्र,  दशमस्थानी रवि, बुध,  गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो
आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती होईल व
बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती होईल आणि
१ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ
मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह
मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी
चालून येतील. मात्र तब्बेतीची काळजी घ्यावी. तब्बेतीच्या काही तक्रारी असतील तर
वैद्यकिय सल्ल घ्यावा. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत छान जाणार आहे.
अती दगदग टाळावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
अष्टमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी रवि,  बुध, गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू
आणि व्ययस्थानी मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला रविची गुरुशी युती
होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला गुरुची बुधाशी व रविशी युती
होईल आणि १ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ
शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ.
केलेल्या उपासनेचे चांगले परीणाम जाणवू लागतील. परदेशगमनासाठी तसेच उपासनेसाठी
चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नविन
विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्तमाच्या
शेवटी तब्बेत सांभाळावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र

Posted by | View Post | View Group