अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र,
अष्टमात रवि, बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ, नेपचून अशी
ग्रहस्थिती असेल.  २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. काही विचित्र अनुभव येऊ
शकतात. वाहने सावकाश चालवावीत. सरकारी यंत्रणेकडून त्रासदायक अनुभव येण्याची शक्यता
आहे. सप्ताह मध्यात एखादा धनलाभ शक्य. जुन्या मित्रांच्या भेटीची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या
कामातून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. सप्ताह
अखेरीस कुटुंबीय किंवा जिवलगां समवेत वेळ मजेत जाऊ शकेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि , बुध, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची
शक्यता आहे. विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना जास्त अनुकुल काळ आहे. सर्जन,
ज्योतिषी, इंशूरन्ससंबंधी काम करणारे व मानसोपचारतज्ञ यांनासुध्दा अनुकुल काळ आहे.
सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
परदेशाशी संबंधीत व्यवहारातून फ़ायदा शक्य आहे. सप्ताह अखेरीस तब्बेतीकडे लक्ष द्यावे. काही
आजार किंवा दुखणे असेल तर विशेष काळजी घ्यावी. उपासना करण्यार्‍यांना उपासनेत खंड
पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि, बुध,
गुरु,  सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी
ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा
हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. मात्र
अती दगदग टाळलेली बरी. तब्येतीच्या काही कुरबुरी जाणवतील. आपल्या हितशत्रूंकडेही लक्ष
ठेवावे. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना
शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या तसेच गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धार्मिक गोष्टींसाठी
काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस कलाकारांना अनुकुल काळ आहे. आपल्या आवडत्या
व्यक्तींसाठी छानशी भेटवस्तू आणाल. परदेशगमनासाठी अनुकुल काळ आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि,  बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात केतू,  अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होतील. मन प्रसन्न
करणार्‍या घडतील. एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात
आपल्या कार्यक्षेत्रात चुका होणार नाही याकडे लक्ष द्यावे. वरीष्ठांशी वाद टाळावेत. संततीच्या
काही समस्या असतील तर त्याला प्राधान्य द्यावे. सप्ताह अखेरीस मित्रांबरोबर मस्त पार्टीचे
बेत ठरवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत शुक्र, चतुर्थात रवि, बुध, गुरु,  पंचमात
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ,  नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी
ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा
हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नाही. घरातील शांतता आपल्या वागण्या बोलण्याने
भंगणार नाही याची काळजी घ्यावी. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी
चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल.
प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात
चांगले काम झाल्याने खुश असाल. लेखक/ ब्लॉगर्स/ कलाकार यांना अनुकुलता जाणवेल.
काहींना प्रवासयोग संभवतात. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत रवि, बुध, गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय
करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात
मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत.
इंशूरन्स एजंट, सर्जन यांना हा काळ चांगला आहे. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील
तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. घरात
छान मेजवानीचा बेत असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी रवि, बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला
रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व
वकिलांना हा काळ चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगले योग आहेत. पुर्वी
केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या सहवासात वेळ
छान व्यतीत होईल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना
अनुकूल कालावधी आहे.  सप्ताह अखेरीस एखादी मनाविरुध्द घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, धनस्थानी शनी,
प्लुटो, तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ,  नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि
व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१
नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ
मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची
काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर विसेष काळजी घ्यावी.पूर्वी
केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. प्रॉपर्टीची कामे लांबण्याची शक्यता आहे. काहींना
नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत
मस्त खरेदीला जाण्यासाठी अनुकुल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी केतू,
तृतिय स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी शुक्र
आणि व्ययस्थानी रवि, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी
केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. घराच्या डागडुगीसाठी किंवा
सजावटीसाठी काही खर्च करावे लागतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना
अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व लेखक यांना अनुकूल काळ आहे.
प्रवासयोग शक्य. सप्तहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच
वकिल यांना हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. काहींना
धनलाभाची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू,  धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  शुक्र आणि लाभस्थानी रवि, बुध,  गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग
होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या
सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग
येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. छान मेजवानीचे योग आहेत.
काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकुल
काळ आहे. काहींना अचानक धनलाभही संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी शुक्र,  दशमस्थानी रवि, बुध,  गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २१
नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान लाभले आहे. काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या
भेटीचे योग संभवतात. जुन्या मित्रांचे गेट-टुगेदर ठेवायला हरकत नाही. काहींना प्रवासयोग
शक्य. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स,
प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची.
काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता. प्रवासयोग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
अष्टमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी रवि,  बुध, गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू
आणि व्ययस्थानी मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० नोव्हेंबरला मंगळाचा गुरुशी
केंद्रयोग होईल. २१ नोव्हेंबरला रविचा हर्षलशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धार्मिक गोष्टींसाठी काळ
चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना संभवतात. सप्ताह मध्यात अचानक काही खर्च
करावे लागतील. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. आपल्या बोलण्याने कुणी दुखावले
जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर प्रवास करणार असाल तर सर्व
प्रकारची काळाजी घ्यावी. लेखन करतांना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत
याची काळजी घ्यावी. विशेषत: सोशल मिडियावर काही पोस्ट करणार असाल तर याची
जास्त काळजी घेतलेली बरी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya