अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर)
या सप्ताहात दिवाळी येत आहे. सर्वांना दिवाळीनिमित्त खुप खुप शुभेच्छा!! महालक्ष्मीची आपणा सर्वांवर उदंड कृपादृष्टी राहो. तुमच्या सर्व मनोकामना महालक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होवोत. सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो. मांगल्याचे दीप आपल्या घरी अखंड तेवू देत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होवो.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात रवि,
शुक्र, अष्टमात बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून
अशी ग्रहस्थिती असेल.  ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना हा
काळ चांगला आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंद साजरा कराल. जवळच्या व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. सप्ताह अखेरीस संमिश्र घटना शक्य. वाहने जपुन चालवा. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात रवि , शुक्र, सप्तमात बुध,
गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल
अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ
मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी. विवाहोच्छूकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. घशासंबंधी काही तक्रारी
जाणवतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात रवि, शुक्र, षष्ठात बुध, गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ
शकतात.  प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना काळ अनुकुल नाही. अचानक अडचणी निर्माण होऊ शकतात. दम्याचा त्रास असणार्‍यांनी तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी. आईशी वाद टाळावेत. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला जाईल.  केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखं वाटेल. सप्तमाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. विशेषत: अ‍ॅसिडीटी किंवा पोटासंबंधी काही त्रास जाणवू शकतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात रवि, शुक्र, पंचमात बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या
सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांच्या भेटीचे योग येतील किंवा त्यांची खुशली
कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण उत्सव समारंभाचे रहाणार आहे. घरात छान खरेदी
करा. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकुल काळ आहे. काहींना अचानक धनलाभ
संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, शुक्र, चतुर्थात बुध, गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग तसेच छान
मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
काहींना कामानिमित्त जवळचे प्रवास शक्य. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, शुक्र, तृतियेत बुध, गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासयोग येतील. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. कलाकारांसाठी हा काळ खुप चांगला आहे. सप्ताह अखेर लेखक/ खेळाडू यांना चांगला आहे. भावंडांकडून भेटवस्तु मिळतील. सहल किंवा प्रवासासाठी हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र धनस्थानी बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा
नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेश प्रवास
करण्यासाठी अनुकुल कालावधी. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. पाकिट सांभाळावे. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य. संततीसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यास अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि
व्ययस्थानी रवि, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात छान जाईल. मित्रमंडळींच्या भेटीगाठीचे योग संभवतात. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. छान पार्टीचे योग संभवतात. परदेशगमन करण्यास अनुकुल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न  करण्यार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी रवि, शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. कार्यालयीन कामानिमित्त काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी करु नये. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  रवि, शुक्र आणि लाभस्थानी बुध,  गुरु, व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ शक्य. उपासना
करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात वरीष्ठ खूष असतील. भागीदारीत व्यवसाय ज्यांना सुरु करायचा आहे त्यांना ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मात्र डोळ्यांची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी रवि, शुक्र,  दशमस्थानी बुध,  गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवात संमिश्र असणार आहे. काही मनाविरुध्द घटना तर काही तुमच्या कष्टाला
दाद देणार्‍या घटना संभवतात. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ/ सर्जन यांना अनुकुल काळ आहे.
सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे योग
शक्य आहेत. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल.
काहींना परदेशगमनाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,  अष्टमस्थानी रवि,  शुक्र,  भाग्यस्थानी बुध, गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंगळ राश्यांतर करुन कुंभ राशीत प्रवेश करेल व रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ८ तारखेला गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय
करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त
व्हाल. चिडचीड वाढेल. मात्र सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. सप्ताह
अखेरीस काही भाग्यवर्धक घटना शक्य. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya