Weekly horoscope ( 7 October – 13 October 2018).
(Astrologer-Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (७ ऑक्टोबरते १३ ऑक्टोबर)

या सप्ताहात शारदीय नवरात्र महोत्सव सुरु होत आहे, सर्वांना खुप शुभेच्छा! देवीची कृपादृष्टी
आपणा सर्वांवर रहावी, आपल्या जीवनात आनंद, उत्साह, संपन्नता कायम रहावी, सर्वांना छान आरोग्य मिळावे हीच याप्रसंगी प्रार्थना!

गुरुचे वृश्चिक राशितील भ्रमण प्रत्येक राशिला कसे असेल याबाबतची पोस्ट १० तारखेला माझ्या ‘ www.astroshodh.com ‘ या वेबसाईटवर बघायला मिळेल.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, षष्ठस्थानात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, बुध, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. त्यांच्या काही समस्या
असतील तर त्यासाठीही वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना प्रतिकुल दिवस आहे. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. थंडी/ सर्दीचा त्रास होऊ शकतो. योग्य ती काळजी घ्यावी. नोकरदार लोकांनी कामात हलगर्जीपणा करु नका. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, पंचमात रवि , षष्ठात शुक्र, गुरु, बुध, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मौज मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक
लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावेल. सोमवार ते गुरुवार थोडासा प्रतिकुल काळ आहे. तब्येतीला जपावे. आजारपण अंगावर काढू नका. विद्यार्थ्यांना प्रतिकुल काळ आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी मात्र अनुकुल काळ आहे. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. सप्ताहाच्या शेवटी पती किंवा पत्नी बरोबर वेळ मजेत जाणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर व्यवहारांचा कालावधी ठरु शकेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, चतुर्थात रवि, पंचमात गुरु, बुध, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.  रविवारचा दिवस भावंडे/ नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे
योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार ते गुरुवार विद्यार्थी, कलाकार तसेच
प्रेमिकांना अनुकुल आहे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. घरात छोटीमोठी खरेदी कराल.
स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी अ‍ॅसिडिटी, पोटाचे,
उष्णतेचे काही त्रास असतील तर त्याबाबत विशेष काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, तृतियेत रवि, चतुर्थात बुध, गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस प्रिय घटनांचा असेल. छान पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायला हरकत
नाही. सोमवार ते गुरुवार प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचेही योग येऊ शकतील.
लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी. मनासारखी कामे होतील. प्रॉपर्टीच्या
कामांसाठी अनुकुल काळ आहे. घरात छान खरेदी कराल. सप्ताह अखेर विद्यार्थी, कलाकार,
खेळाडू यांना अनुकुल आहे. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी हा काळ विशेष अनुकुल आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. आपलं कौतुक होण्याची शक्यता आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, तृतियेत बुध, गुरु,  शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सोमवार ते गुरुवार कुटुंबीयांबरोबर
छान सुर जमलेला असेल. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. नविन वास्तू खरेदी/
विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. कलाकारांना,
वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. प्रवासयोग फ़ायदेशीर ठरु शकतील.
आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. सप्ताह अखेर मात्र तितकासा चांगला नाही. अ‍ॅसिडिटी/ दमा/
खोकला किंवा पोटदुखी यांचा त्रास संभवू शकतो. काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, गुरु,  शुक्र, चतुर्थात शनी,
प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी
रवि अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा
हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर
करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. सोमवार ते गुरुवार हा कालावधी छान आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी फ़ायदेशीर प्रवासयोग संभवतात. मात्र खाण्यापिण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी व मुलांशी वाद टाळावेत.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु,  शुक्र तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आपला आवडत्या व्यक्तींच्या गाठीभेटीचा. कामानिमित्त प्रवास शक्य. धनलाभ होतील. छान खरेदीचे योग संभवतात. सोमवार ते गुरुवार वरीष्ठ कामावर खुष होतील. मनासारखी चांगली खरेदी कराल. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस अति दगदग टाळावी. हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. एकंदरीतच संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी बुध, गुरु,  शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस छान असणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता
वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला
व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सोमवार ते गुरुवार मनासारखी खरेदी होईल. काही
अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, दशमस्थानी रवि, आणि
लाभस्थानी बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. घार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे.
काहींना प्रवासाचे योग संभवतात. सोमवार ते गुरुवार आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार
आहे. वरीष्ठ खुष असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाथी अनुकुल
काळ आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या
शेवटी पूर्वी केलेल्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. डोळ्यांची काळजी मात्र
या कालावधीत घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू,  भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी बुध,  गुरु, शुक्र आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल.
१० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग
होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा
शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या.
सोमवार ते गुरुवार मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. उपासना करण्यार्‍यांना
अनुकुल काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. वरीष्ठ खुष असतील. बढती
किंवा पगार वाढीसाठी अनुकुल काळ. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील.
सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  अष्टमस्थानी रवि, भाग्यस्थानी बुध,  गुरु, शुक्र,  लाभस्थानी शनी, प्लुटो
आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी
षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा
मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२
तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस
चांगला आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु
नये. विमा क्षेत्रात कामं करणार्‍यांसाठी काळ अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक
गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काहींना अचानक धनलाभ
होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
सप्तमस्थानी रवि,  अष्टम स्थानी बुध, गुरु,  शुक्र,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी षडाष्टक होईल. १० तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होईल आणि ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल व गुरु राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि १२ तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी व वकिलांसाठी चांगली असेल.
आपल्या वजोडीदाराच्या तब्बेतीच्या कुरबुरी जाणवत रहातील. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही
आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष,
अध्यात्म, मानसशास्त्र, योग अशा विषयांच्या अभ्यासकांना मात्र हा कालावधी अतिशय
अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होण्याची
शक्यता आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya