Weekly horoscope ( 30 September – 6 October 2018)
(Astrologer in Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)
अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, षष्ठस्थानात रवि, बुध, सप्तमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.
आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांशी भांडणे होणार नाहीत
याची काळजी घ्या. सोशल मिडियावर वादद्रस्त लिखाण टाळा. प्रवास करणार असा तर प्रवासात पुरेशी काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रेमात पडलेल्यांना लग्न ठरविण्यास अनुकुल काळ आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, पंचमात रवि , बुध, षष्ठात शुक्र, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस तब्बेतीची काळजी घ्या. सर्दी/ कफ़ाचा त्रास संभवतो. नंतर मात्र पूर्ण
सप्ताह चांगला आहे. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह
मध्यात जुन्या मित्रांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचेही योग येऊ शकतात. घरातील
वातावरण चांगले राहील. विद्यार्थी, कलाकार, इस्टेट ब्रोकर्स यांना अनुकुल काळ आहे. नविन
विषयाचा अभ्यास किंवा नव्याने उपासना सुरु करायची असेल तर अनुकुल ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, चतुर्थात रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकुल असेल. कुटुंबीयांसह छान खरेदीला जायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. थोडा वेळ स्वत:साठी जरुर काढा. घरातील बिलंवित कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीसंदर्भातील खरेदी-विक्रीसाठी अनुकुल काळ आहे. लेखक, ब्लॉगर्स यांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी कामे पटकन संपवून आराम कर्ण्याकडॆ कल असेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, तृतियेत रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासाचे योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यानंतर धोका असलेले कुठलेही काम करु नये असे ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांच्या भेटी शक्य आहेत. लेखक/ कवी यांना अनुकुल ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, बुध, तृतियेत गुरु, शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. सप्ताहाचा मध्य मित्रमंडळींच्या भेटीगाठीचा असू शकेल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल. मित्रांच्या भेटीघाटींचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामासाठी एखादा खर्च कराल. गृहसजावटीसाठी छानशी खरेदी करायला हरकत नाही.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईंशूरन्सचे काम
करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सूचक
स्वप्ने पडू शकतात. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कामात
चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे
त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही
लाभही होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवट मित्रमंडळींच्या भेटीचा ठरु शकेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, लाभस्थानी रवि, बुध आणि
व्ययस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराची काळजी घ्या. जोडीदाराला काही शारीरीक त्रास असतील
तर दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असु शकेल. काही मनाविरुध्द घटना
घडतील. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या
कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून काम करुन घेण्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे.
त्याचा फ़ायदा करुन घ्या.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, दशमस्थानी रवि, बुध आणि लाभस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी
काम करणार्यांसाठी फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध, दशमस्थानी गुरु, शुक्र आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २
तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत
प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ
द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह
मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल
कालावधी. नोकरीच्या शोधात असाल तर अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर
जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी
आहे. सप्ताह अखेर धार्मिक स्थळांना भेटी देण्यास अनुकुल आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, अष्टमस्थानी रवि, बुध, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २
तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ राशीत
प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ किंवा
पार्टीत सहभागी होण्याचे योग आहेत. गृह सजावटीसाठी वेळ काढाल. ऒळखीच्या लोकांमुळे कामे होतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. राग किंवा चिडचिड होऊ देऊ नका. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दलची एखादी छान बातमी कळेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
सप्तमस्थानी रवि, बुध, अष्टम स्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला बुधाचा षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाचा प्लुटोशी केंद्रयोग होईल आणि ६ तारखेला बुध राशांतर करुन तुळ
राशीत प्रवेश करेल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग
येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. साहित्तिकांसाठी व कलाकारांसाठी चांगला काळ
आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न
राहील. लग्न ठरविण्यासाठी हा काळ अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ
संभवतो. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटी होतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya