Weekly horoscope ( 16 – 22 September 2018)
(Astrologer in Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)
अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, पंचमात रवि, बुध, सप्तमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी जरी झाली तरी नंतर सप्ताह बरा जाणार आहे. सप्ताह मध्य अध्यात्म मार्गातील लोकांना अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी छान काळ आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरी करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. एखादी भाग्यवर्धक घटना शक्य. व्यावसायिक लोक मनासारखे काम झाल्याने खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी जुन्या मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग शक्य. धनलाभाचे योग येऊ शकतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, चतुर्थात रवि , बुध, षष्ठात शुक्र, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना
चांगला काळ आहे. खाण्यापिण्यावर मात्र नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात स्वत:ची व जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. वाहने हळू चालवावीत. सप्ताह मध्यानंतर इंशुरन्स व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत कार्य करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक घटनांचा. काहींना बढतीचे योग येऊ शकतात. एखादी नविन जबाबदारी तुमच्यावर सोपविली जाऊ शकते.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, तृतियेत रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी
ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला
बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला
रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी करणार्यांनी सतर्क रहावे. काही लोक तुमची टिंगलटवाळी करु शकतील किंवा तुम्हाला तुच्छ लेखतील. तुम्ही नाउमेद होऊ नका. तब्बेतीच्या तक्रारी (अॅसिडिटी/ त्वचा विकार) डोके वर काढू शकतील. सप्ताह मध्यात
जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. काहींना प्रवासयोग येऊ शकतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, धनस्थानी रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी
आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकिची मिळालेली थाप उत्साह वाढवेल. प्रेमिकांसाठी लग्न
ठरविण्यासाठी खुप चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र
तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी अनुकुल कालावधी आहे. जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी
घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, तृतियेत गुरु, शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरकामासाठी वेळ काढावा लागेल. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण
असेल. मात्र आपल्या रागामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अतिशय अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या नविन
विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर काळ अनुकुल आहे. प्रेमी युगुलांनाही चांगला काळ
आहे. सप्ताह मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल छान बातमी कळेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी
चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे प्रलंबित
असतील तर आता त्याला गती मिळेल. गृहसजावटीसाठीही हा काळ अनुकुल आहे. सप्ताह
मध्यानंतर एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे
खुश व्हाल. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करण्यासाठी चांगला. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि लाभस्थानी रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय
व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. मेजवानीचे/ पार्टीचे योग येतील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग
येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी अतिशय चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर
मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामात प्रगती संभवते. सप्ताहाच्या
शेवटी विद्यार्थांना चांगला कालावधी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी रवि, बुध आणि
व्ययस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७
तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी
केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल.
मौज मजेचे प्रसंग घडतील. पराक्रमात वृध्दी होईल. मनासारखी खरेदी होईल. लोकांकडून
कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. भावंडांची खुशाली कळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत. घरातील वातावरण छान असेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध आणि लाभस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना धनलाभाचे योग येतील. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योगही संभवतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमस्थानी रवि, बुध, दशमस्थानी गुरु, शुक्र आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७
तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी
केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांबरोबर गाठीभेटीचे योग येतील. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. केलेल्या कामाचे चीज होइल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतो. परदेशाशी संबंधीत काही कामे असतील तर आता करायला हरकत नाही अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या चीजवस्तु सांभाळा काहींना डोळे/ डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानी रवि, बुध, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात मनाविरुध्द घटना घडण्याची शक्यता आहे. काही
अनपेक्षित खर्चही करावे लागु शकतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना वरीष्ठांकडून न मागता
सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष
असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांच्या भेटीगाठीचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, षष्ठस्थानात रवि, बुध, अष्टम स्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला रवि व १८ तारखेला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. १८ तारखेलाच मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला रवि बुध युती होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घ्यावे लागेल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल मात्र रागावर निय़ंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीघाटींचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya