Weekly horoscope ( 9 -15 September 2018)

Astroshodh- (Atul H. Kulkarni ph: 9422088979) -Astrologer-Pune

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर)
श्री गजाननाचे व गौरींचेही आगमन या सप्ताहात होणार आहे. त्यांना प्रथम नमन करुया.
गौरी व गणपतीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृध्दी, आनंद येवो. सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होवो ही प्रार्थना करुन साप्ताहीक भविष्याला सुरुवात करतो.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, पंचमात रवि, बुध, सप्तमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून
अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा
हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला
बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना
चांगला कालावधी आहे. प्रेमी युगुलांसाठीही छान काळ आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांना
चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, फ़ार्मासिस्ट,
आहारतज्ञ, वकील यांना या काळात चांगले अनुभव येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी
जोडीदाराबरोबर काही भावूक क्षण अनुभवाल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. भागीदारीत
व्यवसाय करणार्‍यांसाठीही अनुकुल कालावधी आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, चतुर्थात रवि , बुध, षष्ठात शुक्र, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरात मस्त पार्टीचं वातावरण असेल. एखाद्या उत्सव/ समारंभात
सहभागी होण्याचे योग शक्य. घरकामासाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला
काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. नवीन
विषयाचा अभ्यास सुरु करण्यास अनुकुल ग्रहमान आहे. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी
चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मात्र तब्बेतीची काळजी घ्यावी. शत्रूवर नजर ठेवावी.
वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, तृतियेत रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच एम. आर. साठी हा कालावधी चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, धनस्थानी रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग
येतील. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला
कालावधी आहे. प्रवासयोग येतील. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर
मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताह
अखेरीस प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी चांगले ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, तृतियेत गुरु, शुक्र,
पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू
अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. मन प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील.
काहींना धनलाभ शक्य आहेत. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग
घडतील. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासयोग येतील.
भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या तक्रारी जाणवू शकतील.
खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो,
पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. अचानक उद्भवलेला एखादा खर्चही करावा
लागू शकतो. सप्ताहाच्या मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना
धनलाभाचे योग येतील. कलाकारांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
सप्ताहाच्या शेवटी भावंडांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योगही
संभवतात. लेखकांना व विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र तृतियेत शनी, प्लुटो,
चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि लाभस्थानी
रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला
शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४
तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. जुन्या
मित्रांबरोबर छान गेट टुगेदर करायला हरकत नाही. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न
करेल. केलेल्या कामाचे चीज होइल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही
अनेपेक्षित खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना दात किंवा घशाच्या संबंधी
त्रास जाणवू शकतात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या अखेरीस एखादा धनलाभ
शक्य.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी रवि, बुध आणि
व्ययस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२
तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी,
व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे
केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांच्या भेटीचे
योग येतील. ऒळखीमुळे काही कामे सहजगत्या होऊन जातील. मनासारखी खरेदी होईल.
काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ,
केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध
आणि लाभस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग
होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग
होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग
घ्याल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात
मनासारखे काम होईल. काहींना गुरुभेट शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ
होऊ शकेल. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी
चांगला आहे. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमस्थानी रवि, बुध, दशमस्थानी गुरु, शुक्र आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल,
१२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल
आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. वाहने
जपुन चालवावीत. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. काही भाग्यवर्धक घटना घडू
शकतील. सप्ताह मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ट तुमच्यावर
खुष असतील. विद्यार्थ्यांना अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी लांबच्या प्रवासाचे योग
शक्य. धनलाभाचे योग येऊ शकतात. प्रिय व्यक्ती भेटतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानी रवि, बुध, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला. सप्ताह मध्यात एखादा आजार डोके वर काढू शकेल. आजार अंगावर काढू नका. जोडीदाराशी वाद टाळावेत. धार्मिक कामांसाठी चांगला काळ आहे. काहींना बढतीचे योग येऊ शकतात. एखादी नविन जबाबदारी तुमच्यावर सोपविली जाऊ शकते. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा असू शकेल. बेकायदा केलेल्या गोष्टी अंगलट येऊ शकतील तेव्हा कायद्याच्या चाकोरीबाहेर काहीही करु नका.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, षष्ठस्थानात रवि, बुध, अष्टम स्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल, १२ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल. १३ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल आणि १४ तारखेला बुधाचा नेपचूनशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. मात्र तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढू शकतील. गुप्तशत्रूंच्या कारवायांकडॆ लक्ष ठेवावे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्बेतीलाही सांभाळावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी प्रतिकूल आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer – Pune )

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya