अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२२ जुलै ते २८ जुलै)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात रवि, बुध, राहू, पंचमात शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.
संपूर्ण सप्ताह सतर्क रहाण्याची गरज आहे.  सप्ताहाची सुरूवात तितकिशी चांगली नाही. आपल्या
कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. मात्र इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा
कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असेल. काही भाग्यवर्धक घटना शक्य.
भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. या काळात प्रवास शक्यतो टाळलेलेच बरे.  सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात मनाविरुध्द घटना शक्य. वरीष्ठांना दुखावू नका.
गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने या कालावधीत जरुर करावीत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, बुध, राहू, चतुर्थात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काही भाग्यवर्धक घटना
शक्य. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी
कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल.
वाहने जपून चालवावीत. तब्बेतीच्या काही तक्रारी जाणवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी काही
मनाविरुध्द किंवा त्रासदायक घटना शक्य आहेत. पूर्ण सप्ताह काळजी घेतलेली बरी.
कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करणे चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि , बुध, राहू, तृतिय स्थानात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. शक्य तो सध्या नव्याने काहीही करु नका. सप्ताह मध्यात संमिश्र अनुभव येती. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताह अखेरीस एखादी मनाविरुध्द घटना शक्य. वाहने जपून चालवावीत. मारुतीची उपासना उपयुक्त.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, राहू, धनस्थानात शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची
शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. मात्र प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराला जपावे. काही वाद असतील तर ते वाढणार नाहीत याची काळजी घ्या. गणापतीची उपासना करणे चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात शुक्र, तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, बुध, राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण बिघडणार नाही याकडॆ लक्ष द्यावे. प्रॉपर्टीच्या कामासंबंधी कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याला जपावे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल पण खेळाडूंना अनुकूल असेल. मात्र खेळाडूंनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतात. सप्तहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. शत्रूंच्या कारवायांकडॆ लक्ष ठेवावे लागेल. गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाची आवर्तने करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात
मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, लाभस्थानी रवि, बुध, राहू, आणि व्ययस्थानी शुक्र
अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री
होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल.
नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास करायला चांगला काळ आहे.
सप्ताह मध्यात आईची काळजी घ्यावी. वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर
संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. श्वसनासंबंधी काही
त्रास असतील तर काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना प्रतिकूल काळ
आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. प्रेमिकांना प्रतिकूल काळ आहे.
’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी रवि, बुध, राहू आणि लभात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग. छान
मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
शेजार्‍यांचे विचित्र अनुभव येऊ शकतात. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. घरात
विशेषत: आईशी वाद टाळावेत. या काळात शांत झोप लागणं कठीण आहे. छातीत जळजळ
होणे, अ‍ॅसिडीटी असे त्रास संभवतात. मारुतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी रवि, बुध, राहू, दशमस्थानात शुक्र व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६
तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला
चंद्रग्रहण होणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. डोळ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत राहू शकतात. सप्ताह भावंडांशी/ शेजारी-पाजार्‍यांशी वाद टाळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी रवि, बुध, राहू, भाग्यस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे. सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. काही विचित्र अनुभव येऊ शकतात. सप्ताह अखेरीस कुटुंबीय किंवा मित्रमंडळींशी वाद टाळावेत. तोंड येणे/ डोळ्याचे काही त्रास जाणावू शकतील. गणापती उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  रवि, बुध, राहू,  अष्टमस्थानात शुक्र,  दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना उपासनेत खंड पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत. बेकायदा केलेल्या गोष्टींमुळे गोत्यात येऊ शकतात. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. डोके व पायांना जपावे. गणपती उपासना गरजेची आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, षष्ठस्थानी रवि, बुध,  राहू, सप्तमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला चंद्रग्रहण होणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल. वरीष्ठांना या काळात अजिबात दुखवू नका. वडीलांना जपावे. सप्ताह मध्यात काहींना अचानक पैशांच्या कामाला विलंब होऊ शकतो. मोठे व्यवहार या काळात न केलेले बरे. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताह अखेरीस पाय/ घोटा यासंबंधी त्रास संभवतो. मारुती उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी रवि,  बुध, राहू,  षष्टस्थानी शुक्र,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुध वक्री होणार आहे आणि रविचा शनीशी षडाष्टक योग होईल. २७ तारखेला
चंद्रग्रहण होणार आहे.  सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ शक्य. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यात वडीलांशी किंवा वडीलधारी व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चुका होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस एखाद्या मित्राच्या/ नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope
#astroshodh
#astrology
#weekly