Weekly Horoscope 8 July-14 July

                      अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (८ जुलै ते १४ जुलै)

(’वक्री मंगळाचा हाहा:कार’ या पोस्टचा पुढचा भाग २/३ दिवसात ’अ‍ॅस्ट्रोशोध’  पेजवर शेअर केला जाईल).

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानी रवि, चतुर्थात बुध, राहू, पंचमात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. संततीचे काही प्रश्न असतील तर ते सोडवाल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल सुखद बातमी कळऊ शकेल. लेखक/ ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. तब्बेत छान राहील. सप्ताहाच्या शेवटी घरात छान पार्टीचं वातावरण असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, तृतियेत बुध, राहू, चतुर्थात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे
काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात घरात काही छान प्रसंग घडू शकतील. काहींना धनलाभाचे योग येतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी रवि , धनस्थानी बुध, राहू,
तृतिय स्थानात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांबरोबर भेटीचे योग येतील. काहींना अपेक्षित धनलाभात
अडथळे संभवतात. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानात शुक्र,
चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययात रवि, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी,
व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. भागीदारीत
व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/
आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या
गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात शुक्र, तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानात रवि आणि व्ययस्थानी बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग
संभवतात. मात्र तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. वरीष्ठ खूष
असतील. धनलाभ होतील. सप्ताहाचा शेवट अचानक खर्चाचा असू शकतो. मित्रांशी/ आप्तेष्टांशी
वाद टाळावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमात रवि आणि लाभस्थानी बुध, राहू, व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छानच जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काहींना छान खरेदीचे योग येतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या चीजवस्तू सांभाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यात रवि, दशमस्थानी बुध, राहू आणि लभात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला. सप्ताह मध्यात एखादा धनलाभ शक्य. एखादा आजार असेल तर आजार अंगावर काढू नका. काहींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, अष्टमस्थानात रवि, भाग्यस्थानी बुध, राहू, दशमस्थानात शुक्र व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांसाठी चांगला आहे. मात्र तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढतील. अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असेल तर विशेष काळजी घावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. धार्मिक गोष्टींसाठी मात्र चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात रवि, अष्टमस्थानी बुध, राहू, भाग्यस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताहाचा शेवट भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला नाही. जोडीदाराशी वाद टाळावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्टात रवि, सप्तमस्थानी बुध, शुक्र, राहू, दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. प्रेमिकांनाही हा काळ प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील आवरासावर
तसेच डागडुजीच्या कामासाठी वेळ काढावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, पंचमात रवि, षष्ठस्थानी बुध, शुक्र, राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न असेल. घरात छान वातावरण असेल. विवाहोच्छूक व्यकींना विवाह ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. वैद्यकीय तसेच लॉच्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थात रवि, पंचमस्थानी बुध, शुक्र, राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविचा नेपचूनशी त्रिकोण होईल. ९ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात वादग्रस्थ लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याची काळजी घ्यावी.
सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. एखाद्या नविन विषयाच्या
अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology

Posted by | View Post | View Group