अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१ जुलै ते ७ जुलै)

(Weekly Horoscope 1 uly-7July)

                                                               मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानी रवि, चतुर्थात बुध, राहू, शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग संभवतात. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्यांचा परदेशी कंपनी बरोबर भागीदारीत व्यवसाय आहे त्यांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, तृतियेत बुध, शुक्र, राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक गोष्टींमध्ये मन लागणे कठीण आहे. तब्बेतीच्याही काही तक्रारी जाणवू शकतात. प्रवासात पुरेशी काळजी घेणे उचित ठरेल. सप्ताहाच्या मध्यात गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. मानसशास्त्र, ज्योतिष यासारखे विषय शिकायला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नित्याच्या कामात मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीकडे दुर्लक्ष करु नका. नव्याने व्यायामाची सुरुवात करायला अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मारुतीची उपासना करणे चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी रवि , धनस्थानी बुध, शुक्र, राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताह फ़ारसा चांगला नाही. सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी होईल. अपघातभय आहे. वाहने सावकाश चालवावीत. संतती व जोडीदार यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य जोडीदाराबद्दल काही विचित्र घटना दर्शवीत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपले काम काटेकोरपणे करावे सप्ताहाच्या शेवटी काही काळज्या सतावत राहतील. महादेवाची उपासना करावी. मृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययात रवि, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला पती/पत्नी बरोबर तसेच भागीदारीत व्यवसाय असणा‍र्‍यांनी वाद टाळावे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीची कामे शक्यतो टाळावीत. आपली तब्बेत सांभाळावी. अ‍ॅसिडिटी/ गॅसेसचा/ वाताचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट अनुकुल आहे. घरात छान उत्सवाचं वातावरण असेल. काहींच्या बाबतीत भाग्यकारक घटना घडतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानात रवि आणि व्ययस्थानी बुध, शुक्र. राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र संततीशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यानंतर काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. गूढ विषयांचा अभ्यास करण्यास चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमात रवि आणि लाभस्थानी बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी व कलाकारांनी अती आत्मविश्वास टाळावा. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. वकिल, प्लंबिंग कॉंट्रॅक्टर यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी
आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यात रवि आणि दशमस्थानी बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल काळ आहे. घरात भांडणे होऊ नये म्हणून काळाजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकुल आहे. खेळाडूंना विशेष अनुकूल काळ आहे. ब्लॉगर्स, लेखक यांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. न्युट्रिशियन्स, कौंसिलिंगचे काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, अष्टमस्थानात रवि, भाग्यस्थानी बुध, शुक्र, राहू व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात पार्टीचे वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अतिआत्मविश्वास टाळावा. प्रेमिकांनी जोडीदाराचे मन सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळु शकेल. वैद्यकीय क्षेत्र एम. आर, न्युट्रिशियन्स तसेच फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात रवि, अष्टमस्थानी बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. घरात मस्त पार्टी ठेवायला हरकत नाही. मात्र खाण्यावर व बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. मनासारखे लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना चांगला कालावधी. कलाकारांनाही अनुकुल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्टात रवि, सप्तमस्थानी बुध, शुक्र, राहू, दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. भावंडांची खुशाली कळेल. तुमच्या कलागुणांना छान वाव मिळणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, पंचमात रवि, षष्ठस्थानी बुध, शुक्र, राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.                                                                                                                सप्ताहाच्या सुरुवातीस हात किंवा गुढघे यांच्या दुखण्याचे किंवा दुखापतीचे योग संभवतात. काळाजी घ्यावी. अनावश्यक खर्च टाळावेत. सप्ताह मध्यात चांगले लाभ अपेक्षित आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. प्रवासयोग संभवतात. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सप्ताहाच्या शेवटी काही मनाविरुध्द घटना किंवा खर्च शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थात रवि, पंचमस्थानी बुध, शुक्र, राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाचा शनीशी षडाष्टक होईल, ४ तारखेला शुक्र राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. मात्र त्यांच्याशी वाद होणार नाहीत याची जरुर काळजी घ्यावी. पैसे कुणाकडून येणे असतील तर त्यात अडथळे शक्य. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम करावे. वरीष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. परदेशासंबंधी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही अतींद्रीय अनुभव येण्याची शक्यता आहे. काहींना डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology