अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२४ जून ते ३० जून)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानी रवि, बुध, चतुर्थात राहू, शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी. सप्ताह मध्य विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोचारतज्ञ यांना चांगला. वाहने मात्र हळू चालवावीत. वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात कुचराई करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, बुध, तृतियेत शुक्र, राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगली. तब्बेत सांभाळावी. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. सप्ताह मध्यात पती/ पत्नीला भाग्योदयाच्या संधी अपेक्षित आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्बेतीची काळजी घ्यावी. कुठलेही जोखिम असलेले काम करु नये. सप्ताहाच्या शेवटी काहींना भाग्यवर्धक घटना थक्क करतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी रवि , बुध, धनस्थानी शुक्र, राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना अतिशय विशेषत: गायकांना छान कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी प्रेमिकांना आनंददायी काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. पती/ पत्नीशी वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र , राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययात रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. वकिलांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील लोकांशी वाद टाळावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानात रवि, बुध, आणि व्ययस्थानी शुक्र. राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या कामात व्यत्यय येऊ शकतात. घरातील व्यकींबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी/ पोटाचे विकार असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमात रवि, बुध, आणि लाभस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. काहींना धनलाभ होऊ शकतील. सप्ताह मध्य प्रवासाचे योग आणू शकतो. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते यांच्यासाठी चांगला कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. आपल्या छंदांना वेळ द्यायला हरकत नाही. शेअर्स/ कमोडिटी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करत असाल तर तज्ञांचा सल्ला जरुर घ्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यात रवि, बुध, आणि दशमस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. मन आनंदी असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्याने खुश असाल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीची कामे नकोत. दमा/ श्वासासंबंधी काही आजार असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. अंगावर दुखणे काढू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यस्थानी शुक्र, राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस काही आर्थिक चिंता असतील. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात भावंडांच्या गाठीभेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योग संभवतात. काहींना धनलाभाचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा सप्ताह मस्त जाईल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीच्या कामात सावधानता बाळगा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात रवि, बुध, अष्टमस्थानी शुक्र,  राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा आप्तेष्टाच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. घरासाठी काही खरेदी कराल. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी सप्ताह मध्य चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्टात रवि, बुध, सप्तमस्थानी शुक्र,  राहू,  दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्टांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, पंचमात रवि, बुध, षष्ठस्थानी शुक्र,  राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घ्यावे लागेल. रागावर निय़ंत्रण ठेवावे. वरीष्ठांशी उगीचच वाद घातल्यास त्याचे परिणाम बराच काळ भोगायला लागू शकतात. शांत रहाणे हिताचे. सप्ताहाचा मध्यानंतर काहींना लाभ संभवतात. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीघाटींचे योग संभवतात. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थात रवि,  बुध, पंचमस्थानी शुक्र, राहू, अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला रविचा शनीशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  रविचा मंगळाशी षडाष्टक होईल आणि बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकुल काळ. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताहाचा शेवट काहींना अचानक खर्चाचा. बेकायदा काहीही करु नका. वाहतुकीचे नियम पाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology

Posted by | View Post | View Group