अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१७ जून ते २३ जून)

                                                         मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानी रवि, बुध, चतुर्थात राहू, शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे. वकीलांना हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                       वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, बुध, तृतियेत शुक्र, राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. साहित्तिक, कलाकार, लेखक, कवी यांना हा चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. घरातील वातावरण छान असेल. प्रॉपर्टीच्या कामासाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस तब्बेतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना हा कालावधी चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                            मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी रवि , बुध, धनस्थानी शुक्र, राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर घरातील वातावरण छान राहील. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                           कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र , राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययात रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. काही लाभ संभवतात. अचानक जुने मित्र भेटू शकतात. सप्ताह मध्यात अचानक खर्च करावे लागू शकतात. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमनासाठीही काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. छान पार्टीचा मूड असेल. कलाकारांना व प्रेमिकांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                            सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानात रवि, बुध, आणि व्ययस्थानी शुक्र. राहू  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. प्रवासासाठी लाभदायक काळ आहे. भावंडांशी किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                           कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमात रवि, बुध, आणि लाभस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. सप्ताह मध्यात छान काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. आयात- निर्यात किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे अशांना हा काळ चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुशीत असाल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                          तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यात रवि, बुध, आणि दशमस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताहात छान ग्रहमान आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                         वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यस्थानी शुक्र, राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्टांचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, ईतिहासकार यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभ शक्य. परदेशगमनासाठीही हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                         धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात रवि, बुध, अष्टमस्थानी शुक्र,  राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक धनलाभाची शक्यता आहे. पूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटीगाठी शक्य. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                          मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्टात रवि, बुध, सप्तमस्थानी शुक्र,  राहू,  दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                          कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, पंचमात रवि, बुध, षष्ठस्थानी शुक्र,  राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीची काळजी घेणे उचित ठरेल. कुठल्याही वादात पडू नका. काही आजूबाजूचे किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्‍यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                              मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थात रवि,  बुध, पंचमस्थानी शुक्र,  राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल, २१ तारखेला शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल, २३ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग आणि बुधाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology#weekly