अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१० जून ते १६ जून)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी रवि, तृतिय स्थानी बुध, चतुर्थात राहू, शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामधे चांगले काम झाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. मात्र खाण्यापिण्यावर संयम ठेवा. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकुल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी बुध, तृतियेत शुक्र, राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. प्रवासासाठी व परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला. गुरुमंत्र वा अनुग्रह या काळात जरुर घ्यावा. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. कवी, लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. घरात एखादी पार्टी/ मेजवानीचा बेत आखायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी बुध, धनस्थानी शुक्र, राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून, लाभस्थानी हर्षल आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात. ज्योतिष, अध्यात्म अशा गूढ विषयांचे आकर्षण वाटेल. वाहने मात्र जपून चालवा. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र , राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात  मंगळ, केतू, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल, लाभात रवि, आणि व्ययात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाह ठरविण्यास ग्रहमान चांगले आहे. भागीदारीत ज्यांना व्यवसाय सुरु करायचा असेल त्यांच्यासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. आप्तेष्टांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन असेल. सप्ताह अखेर मस्त खरेदीसाठी व मौजमजा करण्यासाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची
आहे त्यांच्यासाठी हा काळा विशेष चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, दशमस्थानात रवि, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानी शुक्र. राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. मात्र तब्बेतीला जपावे. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे आजार असतील तर आहारावर नियंत्रण ठेवलेले बरे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम होईल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल भाग्यात रवि, दशमात बुध, आणि लाभस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. गणपतीची उपासना करणे चांगले. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना अचानक धनलाभ सुखावतील. प्रवासाचे योगही येऊ शकतात. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, अष्टमात रवि, भाग्यात बुध, आणि दशमस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. एखाद्या समारंभाचं किंवा कार्यक्रमाचं आयोजन घरात करायला हरकत नाही. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानी रवि, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानी शुक्र, राहू व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर कटकटीचा असू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा, मानसोपचारतज्ञ, ज्योतिष या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी मात्र का काळ अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, षष्टस्थानात रवि, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानी शुक्र, राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घावी. वकील व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत छान जाणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात रवि, षष्टात बुध, सप्तमस्थानी शुक्र, राहू, दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला जाईल. विवाह ठरविण्यासही हा काळ चांगला आहे. नविन विषयांच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. सर्दी/ सायनसचा त्रास होऊ शकतो. पावसात भिजणे टाळावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात बुध, षष्ठस्थानी शुक्र, राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगा. भावंडांची किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. वाद टाळावेत. प्रॉपर्टीच्या कामांमधे कटकटी संभवतात. तूर्तास ही कामे सध्या पुढे ढकललेलीच बरी. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. कलाकार, खेळाडू, विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकुल आहे. प्रेमिकांसाठीसुध्दा अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी रवि, चतुर्थात बुध, पंचमस्थानी शुक्र, राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुध राशांतर करुन मिथुन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि १६ तारखेला बुधाचा शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग आहेत. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभ शक्य. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी यांना चांगला कालावधी आहे. काहींना भावंडांकडून लाभ संभवतात. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology