अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (३ जून ते ९ जून)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी रवि, बुध, तृतिय स्थानी शुक्र, चतुर्थात राहू, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात कार्यक्षेत्रात काही वादाचे प्रसंग आणू शकेल. नंतर मात्र पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे प्रसंग सुखावतील. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे.
जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्यांना लाभदायक काळ.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानी शुक्र,
तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. ज्योतिषी, मानसोपचार तज्ञ यांना चांगला काळ आहे. गूढ विषयांमधे रुची वाढेल. काहींना प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रातील इतर लोक काय करतात याकडे दुर्लक्ष करा. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ शक्य. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल काळ आहे. तब्बेतीकडे मात्र दुर्लक्ष करु नका.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी शुक्र, धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून, लाभस्थानी हर्षल आणि व्ययस्थानी रवि व रवि अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने ह्ळू चालवावीत. जोडीदाराचं मन दुखावलं जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला फ़ायदा देणारे ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे. काहींना अचानक धनलाभ, बढती मिळू शकते. विद्यार्थ्यांना नविन विषयाचा अभ्यास सुरु करायला अनुकुल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल, लाभात रवि, बुध, आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
जोडीदाराच्या तब्बेतीबद्दल काही तक्रारी असतील तर दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्य विमा व्यावसायिक, मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांना चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, दशमस्थानात रवि, बुध, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकिल तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने
जपून चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल भाग्यात रवि, बुध, दशमात शुक्र आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्बेतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकुल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, अष्टमात रवि, बुध, भाग्यात शुक्र आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. कुठलीतरी चिंता किंवा विचार त्रस्त करेल. मात्र सकारात्मकता ठेवल्यास व डोकं शांत ठेवल्यास परीस्थिती पूर्ण नियंत्रणात राहील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले
लाभ होतील. एखादं छान बक्षिस, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकेल. प्रेमिकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरी बदल/ नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी अनुकुल काळ आहे. कायदेविषयक कामे करणार्यांसाठीही अनुकुल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानी रवि, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानी राहू व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी असे ग्रहांचे संकेत आहेत. भावंडांशी वाद टाळावेत. साहित्यिकांनी आपल्या लेखात वादग्रस्त विषय टाळावेत. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ
संभवतो. कलाकारांना अनुकुल कालावधी. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, षष्टस्थानात रवि, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग शक्य. परदेशप्रवास किंवा परदेशात व्यवहार करायचा असेल तर अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. वडीलधारी मंडळींची छान मर्जी
असेल. मित्रमंडळी/ आप्तेष्टांकडून एखादं अडलेलं काम मार्गी लागू शकतं मन प्रसन्न असेल.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी
नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात रवि, बुध, षष्टात शुक्र, सप्तमस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस रागावर नियंत्रण ठेवावए. मायग्रेनचा त्रास असणार्यांनी जपावे. आपल्या बोलण्याणे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. सप्ताह मध्यात नोकरी/ व्यवसायानिमित्त प्रवास शक्य. भावंडांकडून काही कामे होऊ शकतात. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, टुर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेर प्रॉपर्टीच्या कामास चांगला आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात
हर्षल, चतुर्थात रवि, बुध, पंचमात शुक्र, षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. पारमार्थिक
उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. घर किंवा घरासाठी लागणार्या गोष्टींच्या खरेदीसाठी अनुकुलता आहे. सप्ताहाच्या मध्यात एखादी भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताह अखेर खरेदीसाठी अनुकूल आहे. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी रवि, बुध, चतुर्थात शुक्र, पंचमस्थानी राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेस रविची बुधाची युती होईल. ७ तारखेला रविचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ८ तारखेच्या उत्तररात्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या गाठीभेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. परदेशगमनासाठीही अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट विचित्र घटनांचा असू शकतो. ज्योतिषी, ईतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#horoscope#weekly#astroshodh#astrology#june