अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२७ मे ते २ जून)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, हर्षल, धनस्थानी रवि, तृतिय स्थानी शुक्र, चतुर्थात राहू,  सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना
चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभ होतील. घरात एखादा छानसा कार्यक्रम
आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात आजार अंगावर काढू नका. काहींना सूचक
स्वप्ने पडू शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधअक, ज्योतिषी, मानसशास्त्राचा अभ्यास
करणार्‍यांना हा कालावधी अनुकुल आहे. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक. धार्मिक स्थळांना भेटी
देण्याचे योगही येऊ शकतात. या सप्ताहात जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी शुक्र, तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी रवि, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ होऊ शकेल. काहींना जुने येणे अचानक मिळाल्याचा आनंद मिळू शकेल. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी चांगला आहे. भागीदारी केलेल्या व्यवसायात
चांगला लाभ होईल. सप्ताहाच्या मध्यानंतर काही मनाविरुध्द घटना घडणे शक्य. ईंशुरन्स संबंधी कामे करणार्‍यांना मत्र अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवट धार्मिक गोष्टींसाठी चांगला. गणपती उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी शुक्र, धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून, लाभस्थानी रवि, बुध, हर्षल आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तब्बेतीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतील. अ‍ॅसिडिटी किंवा पोटासंबंधी आजार असतील तर विशेष काळाजी घ्यावी. काहींना जाणवतील. वाहने जपून चालवावीत. सप्ताह मध्यानंतर संततीबद्दल चांगली बातमी कळेल. विवाहोच्छूक व्यक्तिंना विवाह ठरविण्यासाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून, दशमात बुध, हर्षल, लाभात रवि, आणि व्ययात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात उत्सव, समारंभ, चैन, मौजमजा यांनी भरलेली असेल. मन प्रसन्न असेल.
प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या
कष्टाचे चीज होईल. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे. तब्बेतीची काळजी घ्यावी. नोकरीबदल किंवा नवीन नोकरी मिळविण्यासाठी अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात बुध, हर्षल, दशमस्थानात रवि, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना प्रवासाचे योग
संभवतात. धनलाभाचे योग आहेत. लेखकांना व कलाकारांना चांगला काळ आहे. चांगले यश
मिळण्याची शक्यता आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात
घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीच्या व्यवहारात कटकटी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे प्रॉपर्टीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. सप्ताहाच्या मध्यानंतर नवीन विषयाचा अभ्यास
सुरु करण्यास चांगला आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. शेअर्स/ कमोडीटीमधे गुंतवणुक
करण्यास चांगला काळ आहे मात्र पुरेशी सावधानता बाळगावी. तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा कालावधी चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात बुध, हर्षल भाग्यात रवि, दशमात शुक्र  आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. प्रिय
व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्य लेखक, वक्ते व कवी
यांच्यासाठी चांगला असेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल.
प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. विद्यार्थांना व कलाकारांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात बुध, हर्षल, अष्टमात रवि, भाग्यात शुक्र  आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. संततीचे काही प्रश्न असतील तर ते सोडवाल. मनासारखी खरेदी होईल. तब्बेत छान राहील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. काही धनलाभही होऊ शकतात. एकंदरीतच संपूर्ण सप्ताह उत्तम व भाग्यवर्धक असणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात बुध, हर्षल, सप्तमस्थानी रवि, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानी राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. अचानक उद्भवलेल्या एखादा खर्चही करावा
लागू शकतो. सप्ताह मध्य भावंडांच्या भेटीचा आणि प्रवासयोगाचा. लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू
यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपले खिसा/ पाकिट सांभाळावे. आपल्या
बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सप्ताहाच्या अखेरीस पुन्हा
प्रवासाचे योग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी
मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात बुध, हर्षल, षष्टस्थानात रवि, सप्तमस्थानात शुक्र,  अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध
राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. एखादा छानसा
धनलाभ/ छानशी भेटवस्तू मन प्रसन्न करेल. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून
फ़ायदा संभवतो. जोडीदाराला खुश करण्यासाठी काही खरेदी कराल. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताहाच्या शेवटी डोळ्यासंबंधी काही त्रास जाणवला तर दुर्लक्ष करु नका. वैद्यकिय सल्ला घ्यावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी
नेपचून, चतुर्थस्थानी बुध, हर्षल, पंचमात रवि, षष्टात शुक्र, सप्तमस्थानी राहू,  दशमस्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी,
व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे
केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांकडून काही कामे होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशांना चांगला काळ आहे. आयात-निर्यातीच्या कामासाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुध्द एखादी घटना घडू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात बुध, हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात शुक्र,  षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला बुध राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होणं कठीणच. मात्र रागावर निय़ंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादी कौतुकाची थाप/ एखादं बक्षिस किंवा एखादा धनलाभ शक्य. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, हर्षल, तृतीयस्थानी
रवि, चतुर्थात शुक्र,  पंचमस्थानी राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  २७ तारखेला बुध
राशांतर करुन वृषभ राशीत प्रवेश करेल. १ तारखेला बुधाचा मंगळाशी आणि शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगलाच जाणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर
ज्योतिषी, मानसोपचातज्ञ यांना अनुकूल काळ आहे. चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल.
सप्ताहाच्या शेवटी काहींना चांगले लाभ होतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology