हा माणूस अफ़ाटच आहे, अचाट आहे, सुपरह्युमन आहे, एकमेवद्वितीय आहे,………. अरे हा काय
वेडा आहे का? एव्हढं ग्रेट कोणी असावं का?…..
आज वयाच्या ७६ व्या वर्षी याच्यावर चित्रपट येतात काय आणि ते यशस्वीसुध्दा होतात काय सगळच अजब आहे. वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांच्या ह्रदयावर राज्य करतोय हा माणूस. असे काय आहे या माणसामध्ये? कोणते ग्रहयोग आहेत की ज्यामुळे अमिताभ एव्हढा यशस्वी झाला?
कुंभ लग्न- यांचे व्यक्तीमत्व आकर्षक असते. डोळ्यात एक प्रकारची चमक असते.यांची बुद्धी तल्लख व स्वभाव गंभीर असतो. कुंभ लग्न कलाकार व्यक्तीसाठी योगकारक असते.
लग्नेश शनी चतुर्थात उच्च राशीत (शुक्राच्या राशीत), तसेच चंद्र तुळ या शुक्राच्याच राशीत असल्याने कलेची नैसर्गिक ऒढ.
दशमेश (मंगळ) शुक्राच्या युतीत असल्याने कलेच्या क्षेत्रात कारकीर्द घडली. नेपचुन हा कलेसाठी आवश्यक असलेला ग्रह शुक्राच्या युतीत.
पंचम स्थानावरुन कला बघितली जाते. अमिताभच्या पत्रिकेत पंचमेशाबरोबर शुक्र आहे.
मंगळ व शुक्राची युती असल्याने शुक्राची प्रचंड ताकद निर्माण झाली आहे. या योगामुळे कलेच्या क्षेत्रात यश मिळालं मात्र त्याचबरोबर अनेक नट्यांबरोबर (रेखा, परवीन बाबी इ.) त्याची प्रेम प्रकरणे गाजली.
शुक्राच्या युतीतील रविने अमिताभला कलेच्या क्षेत्रात उच्च म्हणजे सुपरस्टार बनवलं.
द्वितीयेश गुरु (वाचास्थानाचा मालक) कर्क या उच्च राशीत असुन त्याची वाचास्थानावर पुर्ण दृष्टी आहे, तसेच बुध विपरीत राजयोगात (अष्टमेश अष्टमात) असल्याने बलवान झाला आहे. यामुळे यांच्या आवाजात अनोखी जादु निर्माण झाली. त्यामुळेच आवाजाची फ़ेक हा अमिताभच्या अभिनयातला महत्वाचा पैलु ठरला आहे. संभाषणकला व चातुर्याच्या जोरावरच ’कौन बनेगा करोडपती’ सारखी मालिका अमिताभने आपल्याला दिली आणि त्याचा हा सपाटा वर्षानुवर्ष सुरु आहे. याच योगामुळे अमिताभने काही गाणीसुध्दा म्हंटली आहेत.
लग्नी केतु व चंद्र-केतु नवपंचम योगामुळे अभिनयातील बारकाव्यांबद्दल तसेच या झगमगाटी दुनियेत असलेल्या स्पर्धेत आघाडीवर कसे रहाता येईल याचे सतत चिंतन करण्याची सवय लागली.
नवमांश कुंडलीत शुक्र वृषभेत, गुरु कर्केत व रवि सिंहेत उच्च नवमांशी झालेत त्यामुळे कलेच्या क्षेत्रात प्रभुत्व, मान-सन्मान व भरपुर पैसा मिळाला.
कुंभ लग्न तसेच शनीची दशम स्थानावर दृष्टी असल्याने यांनी भुमिकेसाठी कराव्या लागणा‍र्‍या कष्टांचा कधीच कंटाळा न करता जीव ओतुन भुमिका केल्या. सदैव कार्यरत रहाणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे.
अष्टमेश अष्टमात (विपरीत राजयोग) चांगले आरोग्य व दीर्घायुष्य देतो. त्यामुळे अमिताभला त्याच्या कामात प्रकृतीची साथ कायम लाभली. आज ७६ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल एवढं काम तो रोज करत आहे.

गजकेसरी योग- अशा व्यक्ती तेजस्वी, सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त करुन घेणार्‍या असतात. संभाषणकुशल, बुध्दीमान, प्रसिद्ध व सर्वांची मने जिंकणारे असतात. भाग्यातील चंद्राने भरपुर किर्ती दिली.
शुक्र हस्त नक्षत्रात (चंद्राचे नक्षत्र) व चंद्र स्वाती नक्षत्रात (शुक्राचे नक्षत्र) असल्याने कलाकार होण्यासाठी उत्तम ग्रहस्थिती.

आगामी ग्रहस्थिती:
फ़ेब्रुवारी २०१९ नंतर अमिताभसाठी काळ अजुन अनुकुल होणार आहे. मात्र त्याआधी २०१८ चा उत्तरार्ध अमिताभसाठी (विशेषत: २०१८ चे शेवटचे तीन महिने) अजिबात चांगले नाहीत. या काळात तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि अपघात होऊ नये म्हणूनही काळजी घ्यावी लागणार आहे.
अमिताभला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

#amitabh#bigb#astrology#102nonstop#kundli