मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, हर्षल, धनस्थानी
शुक्र, चतुर्थात राहू,  सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू आणि
लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल.
१४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी
त्रिकोण होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
आपल्यासाठी अतिशय छान सप्ताह आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल.
आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील.
वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे काही प्रलंबीत असतील तर ती
मार्गी लागतील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान
पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग संभवतात. प्रवासासाठी अनुकुल
काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. लेखकांना व ब्लॉगर्सना छान काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, तृतियेत राहू, षष्ठात गुरु,
अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी रवि,
बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला
रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल
आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी
कराल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. लांबचा/ परदेश प्रवासासाठी अनुकुल
काळ आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. नवीन नोकरीसाठी
प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो.
सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकतो. आपल्या एखाद्या छंदासाठी किंवा
आपल्या मुलांसाठी एखादा खर्च करावा लागेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात शनी,
प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून, लाभस्थानी रवि, बुध, हर्षल आणि व्ययस्थानी
शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला रवि
वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि १९
तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द किंवा विचित्र घटना संभवतात. पैशांच्या कामात
अचानक अडथळा येऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. आवडत्या
व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे.
कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकुल आहे.
सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ शक्य. प्रॉपर्टीच्या
कामासही यशदायक काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व
प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून दशमात रवि, बुध, हर्षल आणि लाभात शुक्र,
अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला रवि वृषभेत
तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि १९ तारखेला
शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय
सुरु करायला अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार
आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. प्रॉपर्टीच्या कामासही उत्तम काळ
आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीला जपावे. विशेषत: हात व कानाची काही दुखणी असतील तर
काळजी घेणे गरजेचे आहे. परदेशाशी व्यवहार ज्यांचा असतो त्यांना मात्र हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात भाग्यात रवि, बुध, हर्षल दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अती दगदग टाळावी. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे विकार असतील तर २
दिवस काळ्जी घ्यावी. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल काळ आहे. जीम लावणे
किंवा योगासने अशा गोष्टी सुरु करण्यासाठी अत्यंत अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. लेखक/ कवी यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. छान लाभ झाल्याने प्रसन्न असाल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात रवि, बुध, हर्षल भाग्यात शुक्र  आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. सप्ताह मध्य
उत्तम प्रवासाचे असतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. सप्ताहाचा शेवट मात्र तितकासा चांगला नसेल. आपल्या कामाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. म्हणजे वरीष्टांना तुमच्या चुका काढायची संधी मिळणार नाही.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात रवि, बुध, हर्षल, अष्टमात शुक्र  आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात
फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी,
सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती
अनुकुल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना
चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात रवि, बुध, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी राहू व
व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल. १४
तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण
होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह
मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. परदेशाशी व्यवहार करणार्‍यांसाठी
अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी
आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ,
केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात रवि, बुध, हर्षल, षष्टस्थानात शुक्र,  अष्टमस्थानी
राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल.
१४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी
त्रिकोण होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही
हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील
लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर
काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास
असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी
घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात. प्रेमिंकांनाही छान
काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी रवि, बुध, हर्षल, पंचमात शुक्र, सप्तमस्थानी राहू,  दशम स्थानी गुरु, आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल.
१४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण
होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली
कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या
भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल.
विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. नोकरदार
व्यक्तींवर वरीष्टांची चांगली मर्जी राहील. सप्ताह अखेरीस तब्बेतीला जपावे. नोकरीबदल
किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे,
वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात
रवि, बुध, हर्षल, चतुर्थात शुक्र,  षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल.
१४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण
होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास
लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग
संभवतात. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह
मध्यानंतर  काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर
विद्यार्थ्यांना चांगली आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात रवि, बुध, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र,  पंचमस्थानी राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  १३ तारखेला बुध व हर्षलची युती होईल.
१४ तारखेला रवि वृषभेत तर शुक्र मिथुनेत प्रवेश करेल. १८ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण
होईल आणि १९ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या
मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात
कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे
योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा
लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला
आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope#astroshodh#astrology