मंगळ नुकताच दि. २ मे २०१८ रोजी राशांतर करुन मकर या त्याच्या उच्च
राशीत आला आहे. तेथे त्याचा मुक्काम आता पाच महिने म्हणजे ६-११ पर्यंत
असणार आहे. यामधे मंगळ २७-०६ ते २७-०८ या काळात वक्री होणार आहे.
वक्री असतांनाचा कालावधी सोडून बाकी काळासाठी हा मंगळ कसा असणार
आहे ते आपण बघणार आहोत. सध्या सूर्य त्याच्या उच्च राशीत म्हणजे मेष
राशीत १५ मे पर्यंत असणार आहे. त्या सूर्यावर मंगळाची ४ थी दृष्टी पडणार
आहे. सूर्य सध्या ऎन भरात असल्याने प्रखर तेजाने तळपतो आहे त्यात
मंगळाची भर पडणार आहे. उष्णतेचे नविन उच्चांक स्थापित झाले तर आश्चर्य
वाटायला नको. सर्वांना विनंती आहे की ऊन्हात जाणे शक्यतो टाळावे. ते
शक्य नसेल तर सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी. ऊष्माघात (सनस्ट्रोक) होऊ
नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
भारताची रास मकर मानली जाते. मकर राशीतलं हे भ्रमण नविन चिंता
निर्माण करण्याची शक्यता आहे. सीमाप्रश्नाबाबत शेजारी राष्ट्रांपासून विशेष
सावधानता बाळगावी असे ग्रहमान दर्शवीत आहे. अतिरेक्यांच्या कारवायांकडेही
लक्ष देणे गरजेचे ठरेल. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न पराकोटीचा
प्रयत्न करतील. मोठे अपघात, घातपात या काळात वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक धोरणे या काळात चुकणार नाहीत ना याकडे सरकारने बारकाईने लक्ष
द्यावे. काही आर्थिक घोटाळे नव्याने समोर येण्याची शक्यता आहे.
मंगळाचं हे भ्रमण प्रत्येक राशीला कसं जाईल हे आता आपण बघुया.
मेष रास- आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास काहींना प्रमोशन/ अधिकारात
वाढ संभवते. शत्रूंवर विजय मिळवता येईल. मात्र तुमची चिडचीड व ईगो वाढणार
नाही याची काळजी जरुर घ्यावी.
वृषभ रास- बेकायदा केलेल्या गोष्टीपासून त्रास संभवतो. डीहायड्रेशन होणार नाही याची
काळजी घ्यावी. पॉपर्टीचे व्यवहार करतांना विशेष काळजी घ्यावी. वरीष्ठांना दुखावू नका.
मिथुन रास- वाहने जपून चालवावीत. मित्रांशी व भावंडांशी वाद टाळावेत. अॅनिमिया/
रक्तासंबंधी काही समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घावा. आजार अंगावर काढू नका.
कर्क रास- पती/ पत्नीचे आरोग्य सांभाळावे. रागावर नियंत्रण ठेवावे. घर आणि नोकरी
व्यवसाय दोन्ही सांभाळतांना दमछाक होईल.
सिंह रास- हा शुभ काळ असुन तुमच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर
सहजगत्या विजय मिळवता येईल. फ़क्त या कालावधीत तुमचा ईगो वाढणार नाही याची
काळजी घ्यावी.
कन्या रास- संततीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा. शेअर्स किंवा
तत्सम व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुणाशीही विनाकारण शत्रुत्व करु नका.
कायद्याची चाकोरी सोडू नका.
तुळ रास- प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावधानता गरजेची आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही
याची काळजी घ्यावी. अॅसिडीटी/ जळजळ किंवा छातीसंबंधी आजार काहींना त्रास देऊ शकतात.
वृश्चिक रास- हा अतिशय चांगला काळ असुन पराक्रमात व अधिकारात वृध्दी होईल. काहींना
धनलाभाची शक्यता आहे. शत्रु बलहीन/ नेस्तनाबूत होतील. आत्मविश्वास वाढविणार्या
घटना घडतील.
धनु रास- आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळाजी घ्यावी. कुटुंबातील
कुणाशी विनाकारण रुसवे फ़ुगवे टाळावेत. आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्यावी.
मकर रास- प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावधानता बाळागणे. आईशी किंवा वडीलधारी व्यक्तींशी वाद
टाळावेत. अतिराग टाळावा. ऊन्हात जास्त फ़िरणे टाळावे. उष्णतेच्या विकारांपासून त्रास संभवतो.
कुंभ रास- बेकायदा केलेले व्यवहार गोत्यात आणू शकतात. परदेशगमन किंवा परदेशात केलेले
व्यवहार मात्र फ़ायदेशीर ठरु शकतात. भावंडांशी व जोडीदाराशी वाद टाळावेत.
मीन रास- अतिशय चांगला काळ आहे. लाभ होतील. मित्र व वरीष्ठ पूर्ण सहकार्य करतील. नविन
परीचय फ़ायदेशीर ठरतील. तुमचा आत्मविश्वास पूर्ण भरात असेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक
प्रकारची झळाळी आलेली दिसेल.
#planet#mars#astrology