आज दि. १८ एप्रिल रोजी शनी वक्री होत आहे. आता तो ६ सप्टेंबर पर्यंत वक्री असेल(धनु राशीतच). ६
सप्टेंबर नंतर तो मार्गी होईल. प्रत्येक राशीला शनी ज्या राशीत स्थित आहे त्या स्थानपरत्वे वेगवेगळी
फ़ळे मिळणार आहेत.

मेष रास-
१) बर्‍याच काळापासुन आजारी असलेल्या व्यक्तींना आता दिलासा मिळू शकेल.
२) कार्यक्षेत्रातील विरोधक गेल्या अडीच/ तीन वर्षांपासुन त्रास देत असतील तर आता ते नरमताना दिसतील.
३) लाभाचे अडकलेले स्त्रोत आता मोकळे व्हायला लागतील.
४) बेकायदा कुठलीही गोष्ट या कालावधीत करु नका.
५) जोडीदाराशी या काळात कलह होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच जोडीदाराच्या तब्बेतीचीही काळजी
घेणे गरजेचे आहे.
६) परदेशगमनाच्या संधी मिळू शकतील.
७) ’ ॐ नम: शिवाय ’  या मंत्राचा जप करने इष्ट.

वृषभ रास-
१) गेल्या काही काळापासुन ज्यांना ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास जाणावत असेल त्यांना आता हा
कालावधी सुसह्य असणार आहे. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी या काळात जाणवतील.
२) कायदा, फ़िजिकल फ़िटनेस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे.
३) काही अनपेक्षित लाभ संभवतात.
४) कार्यक्षेत्रात आता उत्साहाचं वातावरण दिसायला लागेल.
५) लांबच्या प्रवासाचे योग संभवतात मात्र प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे.
६) महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दर शनीवारी मारुतीचे दर्शन जरुर घ्यावे.

मिथुन रास-
१) संततीच्या काही समस्या असतील तर तिकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल.
२) काहींना अचानक मिळालेली शाबासकी, बक्षिस किंवा लाभ उमेद वाढवतील.
३) घरातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराला वेळ द्या.
४) कार्यक्षेत्रातील वरीष्ठांशी जमवून घ्यावे लागेल.
५) ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर आता पुढील ४.५ महीने काळ्जी घेणे गरजेचे आहे.
६) आदित्य ह्र्दय स्तोत्राचा नित्य नियमित पाठ करावा.

कर्क रास-
१) प्रॉपर्टीच्या कामात विलंब होऊ शकतो. आईच्या तब्बेतीलाही जपावे.
२) घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
३) दम्याचा त्रास असणार्‍यांनी या कालावधीत काळाजी घ्यावी.
४) वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे.
५) नियमित व्यायाम/ योगासने करणे हिताचे आहे.
६) धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे.
७) गुरु उपासना जरुर करावी.

सिंह रास-
१) तब्बेतीच्या काही तक्रारी असतील तर दुर्लक्ष करु नका.
२) काही चिंता या कालावधीत सतावत रहातील.
३) फ़ेसबुक किंवा तत्सम ठिकाणी केलेल्या एखाद्या पोस्टमुळे अडचणीत येणार नाही
याची पुरेशी काळजी घ्यावी.
४) भावंडांशी वाद टाळावेत.
५) प्रवासात काळजी घ्यावी.
६) आदित्य ह्रदय स्तोत्र रोज म्हणावे.

कन्या रास-
१) प्रॉपर्टीच्या कामात अडचणी किंवा विलंब होऊ शकतो.
२) आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत या गोष्टीची काळजी या कालावधीत
घेणे गरजेचे आहे. घरातील वातावरण शांत ठेवावे.
३) जोडीदाराशी जमवुन घ्यावे लागेल.
४) आईच्या तब्बेतीला जपावे.
५) छाती किंवा श्वासासंबंधी काही आजार असतील तर काळजी घेणे उचित ठरेल.
६) मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात रोज म्हणावे.

तुळ रास-
१) वातविकार किंवा हातासंबंधी आजार असतील तर आता त्याकडे विशेष लक्ष
देणे गरजेचे आहे.
२) प्रवास जपुन करावेत.
३) भावंडांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी अनुकुल काळ आहे. आपल्या विरोधकांच्या
कारवायांकडे लक्ष ठेवावे.
५) वकिली करणार्‍यांना हा कालावधी अतिशय चांगला जाईल.
६) मारुती स्तोत्र किंवा हनुमान वडवानल स्तोत्र रोज म्हणावे.

वृश्चिक रास-
१) आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत या गोष्टीची काळजी या कालावधीत
घेणे गरजेचे आहे.
२) डोळ्यांची या काळात काळजी घ्यावी. चष्मा असणार्‍यांनी चष्म्याचा नंबर वाढत नाहीये
ना याची खात्री करुन घ्यावी.
३) बेकायदा कुठलीही गोष्ट या कालावधीत करु नका.
४) परदेशगमनासाठी हा काळ अनुकुल आहे.
५) विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा.
६) मारुती स्तोत्र रोज म्हणावे. रोज मारुतीचे दर्शन घ्यावे. शक्य नसल्यास किमान शनीवारी
तरी मारुती मंदीरात अवश्य जावे.

धनु रास-
१) मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी या काळात खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घ्यावी. कडक
ऊन्हात जातांना डोक्यावर टोपी जरुर घालावी.
२) मित्रांच्या किंवा एखाद्या नातेवाईकाच्या वागण्याचा विचित्र अनुभव येऊ शकेल.
३) प्रॉपर्टीसंबंधीची कामे सध्या न करता शक्यतो ४.५ महीने पुढे लोटावी.
४) काहींचे अडकलेले पैसे अचानक मिळण्याची शक्यता आहे.
५) रविवारी काळभैरवाचे दर्शन घ्यावे.

मकर रास-
१) गाडी जपुन चालवावी. गाडीची कागदपत्र, लायसन्स जवळ बाळगावेत.
२) बेकायदा केलेली कुठलीही गोष्ट या काळात अंगलट येऊ शकते.
३) वडीलधारी मंडळी किंवा कार्यक्षेत्रातील वरीष्ठ दुखावले जाणार नाहीत याची योग्य ती
खबरदारी घेणे गरजेचे आहे.
४) भावंडांशी वाद टाळावेत.
५) मारुती स्तोत्र रोज म्हणावे.

कुंभ रास-
१) काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ शक्य.
२) धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे.
३) लांबच्या प्रवासाचे योग संभवतात.
४) खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
५) मान/ घशासंबंधी काही त्रास होऊ शकतात.
६) महालक्ष्मीअष्टक नित्य म्हणावे.

मीन-
१) काही मनाविरुध्द घटना शक्य.
२) ज्योतिषी, मानसोपचार तज्ञ, इतिहासकार यांना हा कालावधी अनुकुल आहे.
३) आपल्या रागामुळे किंवा बोलण्यामुळे काणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
४) महत्वाचे निर्णय शक्य असेल तर ४.५ महीने पुढे ढकलावेत.
५) गुरु उपासना करावी.

Posted by | View Post | View Group