अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२०)

(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्शल, तृतियस्थानी राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. जोखिम असलेली कामे टाळलेलीच बरी. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. घरातील वातावरण आनंदी असेल. वास्तू खरेदी-विक्री करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. धनलाभ होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर लेखक/ कवि यांना प्रतिकूल कालावधी आहे. सोशल मिडियावर वादग्रस्त लेखन या काळात टाळलेले बरे. भावंडांशी वाद होणार नाही याचीही काळजी या काळात घ्यावी लागेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात राहू, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला बेकायदा व्यवहार करु नका. अचानक उदभवलेल्या खर्चाने त्रस्त होऊ शकाल. भागीदारीत व्यावसाय असेल तर भागीदाराशी वाद टाळा. त्यानंतर ग्रहमान अनुकूल होत आहे. लेखक, कवी, साहित्यिक, कलाकार यांना खुप छान कालावधी आहे. तुमच्या हातून चांगलं काम होईल त्यामुळे तुम्ही प्रसन्न असाल. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ काढा. नविन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर त्याची सुरुवात आत्ता जरुर करा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानात सूर्य, चतुर्थस्थानात बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, आणि लाभस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला मित्र मैत्रिणींचा सहवास लाभण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. काही धनलाभ होतील. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन लाभ संभवतात. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. घरातील वातावरण छान असेल. प्रॉपर्टीविषयक कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, तृतियस्थानी बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्शल, आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. घराच्या सुशोभीकरणासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल.  मात्र अती दगदग टाळा. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगली आहे. ज्यांचा कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नविन संधी मिळण्याची शक्यता आहे. पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठीही हा काळ चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्शल आणि लाभस्थानात राहू व व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे मात्र तरीही वरीष्ठांचं समाधन होण्याची शक्यता कमीच आहे. सॉफ़्टवेअर किंवा आयटी क्षेत्रातील लोकांना मात्र हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी संपर्क साधाल. मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्शल, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखिम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करायला अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्शल, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. एखाद्या समारंभाचं किंवा कार्यक्रमाचं आयोजन घरात कराल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. काहींना सुचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. मात्र हा काळ शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्शल, अष्टमस्थानात  राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्शल, आणि सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही हा काळ चांगला आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्य फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांना काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. आपला आत्मविश्वास वाढविणारं ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्शल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. विवाहोत्सुक व्यक्तींना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालुन येतील. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना हा काळ खुप चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्शल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध,  लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग येतील. या काळात सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात नोकरदार लोकांना अनुकूल काळ आहे. मात्र या काळात तब्येतीच्या काही समस्या जाणवतील. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी वेळ काढावा लागेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ, हर्शल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शुक्र षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला मंग्ळ व चंद्राची युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला  चंद्राचा सुर्याशी लाभयोग, बुधाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असेल. एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणे त्रासदायक ठरु शकेल. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)