अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ जुलै ते ११ जुलै २०२०)  astrologerinpune,  vastuconsultantinpune

सप्ताहाच्या सुरुवातीलाच गुरुपौर्णिमा आहे. माझे आई-वडिल, गुरुजन यांना नमस्कार. जीवनात अनेक गोष्टी अनेक लोकांकडून शिकलो मग त्या व्यक्ती असोत वा पुस्तके असोत. अशा समस्त गुरुतत्वाला माझा प्रणाम. याच दिवशी होणारे ग्रहण हे भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचे कोणतेही वेधादी नियम पाळण्याची गरज नाही.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळण्याचे योग संभवतात. संपूर्ण सप्ताह धार्मिक गोष्टींसाठी/ उपासनेसाठी अनुकुल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईंशुरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कामात अचानक अडथळे किंवा त्रास संभवतो. शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांशी विनाकारण वाद वाढवू नका. सप्ताहाच्या शेवटी काही चांगल्या व आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील.
उपासना: हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. घरच्यांबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय असणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवहार स्वच्छ ठेवावेत. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा फ़ॅटी लिव्हरचा त्रास असेल त्यांनी आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. अंगावर दुखणे काढू नका. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची पुर्ण काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ दशमस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. वादविवादात यश संभवते. नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराला जपावे. वादविवाद टाळावेत. त्याच्या तब्येतीविषयी काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे विकार असतील त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. अती मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सप्ताहाचा शेवट काहींना भाग्यवर्धक आहे. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना हा संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना विरोधी ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. संधीवात, ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी. वकील व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र हा अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर वाहने हळू चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ,
अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन लाभ संभवतात. सप्ताहाचा शेवट जोडीदाराला चांगला आहे. जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत कराल. लेखकांना यशदायक काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल,
अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घरातील काही दुरुस्तीची कामे प्रलंबीत असतील तर आता त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे मात्र यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. कमोडीटी, शेअर मार्केट किंवा तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक सध्या नुकसानीची ठरु शकेल. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल,
सप्तमस्थानात शुक्र आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस काहींना धनलाभाची प्राप्ती होऊ शकेल. वादाचे प्रसंग मात्र टाळावेत. काहींना डोळ्यांच्या किंवा दातांच्या काही समस्या जाणवतील. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. घरातील वातावरण छान असेल. प्रॉपर्टीच्या संबंधी कामे करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल,
षष्ठस्थानात शुक्र आणि सप्तमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. छान खरेदी होईल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. प्रवासाचेही योग येऊ शकतात. घरातील वातावरण चांगले राहील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. लेखक/ ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे. मात्र वादग्रस्त लिखाण टाळावे. प्रॉपर्टीपासून फ़ायदा संभवतो. नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- हा सप्ताह खर्चाचा असेल. एखाद्या मित्राच्या/ आप्तॆष्टाच्या विचित्र बोलण्याचा किंवा वागण्याचा त्रास होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबीयांबरोबर वादाचे प्रसंग टाळावेत. कॉंप्यूटरवर जास्त वेळ काम करणार्‍यांनी डोळ्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस अनुकूल कालावधी आहे. काही लाभाचे प्रसंग घडतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ होऊ शकतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, लाभस्थानात  गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी वेळ खर्च होईल. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठ आपल्या कामावर खुश असतील. लाभदायक घटना घडू शकतात. धनलाभाचेही योग येतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. वरीष्ठ आपल्या कामावर खुश असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल व चंद्र आणि गुरुची युती होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनीशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. भाग्यवर्धक काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रमंडळींशी संपर्क साधाल. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या गुंतवणूकीमधून फ़ायदा संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)