अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१९) 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ आपल्या कामावर खुश असतील. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग संभवतात. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्यांचा परदेशी कंपनी बरोबर भागीदारीत व्यवसाय आहे त्यांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, बुध, सप्तमात रवि, अष्टमात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक गोष्टींमध्ये मन लागणे कठीण आहे. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवू शकतात. प्रवासात पुरेशी काळजी घेणे उचित ठरेल. सप्ताहाच्या मध्यात गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. मानसशास्त्र, ज्योतिष यासारखे विषय शिकायला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नित्याच्या कामात मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर काही लाभ होण्याची शक्यता आहे. नव्याने व्यायामाची सुरुवात करायला अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, बुध, षष्ठात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह सुरुवात फ़ारशी चांगली नाही. सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी होईल. अपघातभय आहे. वाहने सावकाश चालवावीत. संतती व जोडीदार यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य जोडीदाराबद्दल काही विशेष घटना दर्शवीत आहे. धार्मिक गोष्टींबाबत काही गोष्टी आधीच ठरवलेल्या असतील तर त्यासाठी वेळ काढाल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले काम काटेकोरपणे करावे. सप्ताहाच्या शेवटी भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, बुध, पंचमात रवि, षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या समारंभात हजेरी लावाल. मात्र पती/पत्नी बरोबर तसेच भागीदारीत व्यवसाय असणा‍र्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टाळावे. सप्ताह मध्यात वाहने जपून चालवावीत. आपली तब्बेत सांभाळावी. अ‍ॅसिडिटी/ गॅसेसचा/ वाताचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट नोकरीबदल करण्यासाठी अनुकूल आहे. वैद्यकीय व्यावसायिक, आहारतज्ञ, वकील यांना फ़ायदेर्शीर ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे सध्या न केलेलीच बरी.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, बुध, चतुर्थात रवि, पंचमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र संततीशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यानंतर काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. गूढ विषयांचा अभ्यास करण्यास चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, बुध, तृतियस्थानात रवि, चतुर्थात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी व कलाकारांनी अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करत असाल तर सध्या मोठी जोखिम नको. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. वाताचा, श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. वकिल, प्लंबिंग कॉंट्रॅक्टर यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी भाग्यदायक कालावधी आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, धनस्थानी रवि, तृतिय स्थानात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल काळ आहे. घरात भांडणे होऊ नये म्हणून काळाजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना अनुकूल काळ आहे तर ब्लॉगर्स, लेखक यांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. न्युट्रिशियन्स, कौंसिलिंगचे काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात पार्टीचे वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अतिआत्मविश्वास टाळावा. प्रेमिकांनी जोडीदाराचे मन सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळु शकेल. वैद्यकीय क्षेत्र एम. आर, न्युट्रिशियन्स तसेच फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ, बुध आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. घरात मस्त पार्टी ठेवायला हरकत नाही. मात्र खाण्यावर व बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. मनासारखे लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना चांगला कालावधी. कलाकारांनाही अनुकूल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, बुध, लाभस्थानी रवि आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. भावंडांची खुशाली कळेल. तुमच्या कलागुणांना छान वाव मिळणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, बुध, दशमस्थानी रवि आणि लाभस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. अनावश्यक खर्च मात्र टाळावेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात चांगले लाभ अपेक्षित आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. प्रवासयोग संभवतात. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सप्ताहाच्या शेवटी काही मनाविरुध्द घटना शक्य.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक़्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक़्राशी व शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. मात्र त्यांच्याशी वाद होणार नाहीत याची जरुर काळजी घ्यावी. पैसे कुणाकडून येणे असतील तर त्यात अडथळे शक्य. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम करावे. वरीष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. परदेशासंबंधी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही अतींद्रीय अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group