कपिल शर्माचे काय  होणार ?
अत्यंत कमी वेळात कपिलने प्रचंड यश मिळवत स्वतःची कॉमेडी सम्राट अशी ओळख निर्माण केली. धनस्थानातील शुक्र, मंगळ, सुर्य तसेच दशमेश मंगळ धनस्थानी अशा ग्रहस्थितीने त्याला हजरजवाबी बनवले. त्याला संभाषणकौशल्य प्रदान केलं त्या जोरावर तो अल्पावधीत मोठे यश मिळवून प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसला.
सध्या मात्र याच बरॊबर त्याच्या पत्रिकेतील दुसरा ग्रहयोग म्हणजे वाचास्थानाचा (धनेशाचा) स्वामी गुरु अष्टम स्थानी शनी ग्रहाच्या युतीत आहे. याच योगामुळे दुसऱ्यांवर व्यंगात्मक बोलणे, दुसऱ्याला टोचून बोलणे हा त्याचा स्वभावच बनला आहे. त्याच्या अपमानास्पद आणि टोचून बोलण्यामुळे इतर लोक कळत न कळत दुखावले जातात. हीच गोष्ट सुनील ग्रोव्हर व इतरांबरोबरही घडली. आणि त्याचा परिणाम अत्यंत लोकप्रिय शोवर झाला. शोचा टीआरपी खाली आला.  
सध्या कपिलला व्ययेश शनीची महादशा व अष्टमेशाची अंतर्दशा सुरु आहे त्यामुळेच त्याला अचानक विरोधी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. ही ग्रहस्थिती तब्बेतीबाबतही खूप वाईट आहे. शनीच्या महादशेत अहंकार सोडावाच लागतो अन्यथा शनी अशा माणसाला रसातळाला नेऊन  ठेवतो. कपिल बरोबरही असच काहीसं झालाय.

काय होणार पुढे ?
सध्या कपिलला व्ययेश शनीची महादशा व अष्टमेशाची अंतर्दशा सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये व्ययेश शनीच्या महादशेतील व्ययस्थानी असलेल्या केतूची अंतर्दशा सुरु होत आहे. हा संपूर्ण काळ कपिलची परीक्षा पहाणारा ठरू शकतो. तब्बेतीला जपावे लागेल. तसेच सर्वच क्षेत्रात पिछेहाट होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे त्याच्या मनावर प्रचंड दडपण राहील.
वरील ग्रहयोगांमधून तरून गेल्यास जानेवारी २०१९ पासून परिस्थितीत नक्कीच सुधारणा होणार आहे . मात्र पुन्हा प्रचंड यश मिळवण्यास २०३१ पर्यंत वाट बघावी लागेल कपिल शर्माला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

#Kapil sharma#Astrology#Horscope#Satum#Mahadasha