अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी, हर्शल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टी विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. काहींना चांगले लाभ होतील. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. संततीशी वाद टाळा. प्रेमिकांना हा काळ प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. नोकरी करणार्यांनी आपल्या कामात हयगय करु नका. जोडीदाराशी वाद टाळा. तुम्च्या तब्येतीचीही काळजी या काळात घेणे आवश्यक आहे. नविन गुंतवणूक करत असाल तर काही दिवस थांबलेले बरे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री) आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. काहीतरी छान काम होईल. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट, इंटेरिअर डिझायनर व बांधकाम व्यावसायिक यांना अनुकूल काळ आहे. एखाद्या नविन विषय शिकायचा असेल किंवा आपल्या छंदाला वेळ द्यायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट व वकीलांना अनुकूल कालावधी आहे. संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती आनंद देणारी ठरेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना हा कालावधी उत्तम आहे. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात आपल्या आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे यांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादा धनलाभ किंवा एखादं बक्षिस, कौतुकाची एखादी अचानक मिळालेली थाप असे योग काहींना येणार आहेत. प्रेमी जीवांसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, तृतियस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात चांगलं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. त्यापासून काही लाभही होतील. घरात प्रसन्न वातावरण असेल. विद्यार्थी, उपासक व वकील यांना चांगले ग्रहमान आहे. आपल्या छंदांना जरुर वेळ द्या. नविन काही शिकायचं असेल तर त्यालाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात संहिश्र ग्रहमान आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. काहींना मात्र उलट अनुभव येतील. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असणार आहे. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. लाभदायक काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ (वक्री), तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ (वक्री), धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा व गुरुचा त्रिकोण होईल आणि चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकुल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)