तुमचं नाव तुम्हाला लकी आहे का? तुमच्या कंपनीचं नाव भाग्यकारक आहे का?
सचिन तेंडूलकर प्रसिध्दीच्या झोतात आल्यानंतर, नविन जन्माला येणाऱ्या खूप बाळांची नावं ’सचिन’
ठेवली गेली. आता ’विराट’ असं नाव ठेवण्याची फॅशनच आलीये. वेगवेगळ्या काळात त्या त्या काळात
प्रसिध्द असणारे नट, क्रिकेटर किंवा प्रसिध्दीच्या झोतात असणाऱ्या व्यक्ती यांच्या नावावर बाळांची
नावं ठेवली गेली. प्रत्येकच आईवडिलांना आपल्या मुलामुलींनी यशस्वी व्हावे, कर्तृत्ववान व्हावं, प्रसिध्द
व्हावं असं वाटत असतं. त्यासाठीच त्यांना अशी नावं ठेवावीशी वाटतात.
पण प्रत्येकच सचिन हा सचिन तेंडूलकरप्रमाणे यशस्वी नाही होऊ शकला. किंवा प्रत्येक अमिताभ हा
बिग बी सारखा नाही बनू शकला. खरच यशस्वी माणसासारखं नाव ठेवलं म्हणजे माणूस यशस्वी होतो
का? होईल का? आपल्याला काय वाटतं?
प्रत्येकाची कुंडली वेगवेगळी असते. त्याच्या कुंडलीला अनुसरुनच नावं ठेवायला हवीत. कुंडलीला
अनुसरुन म्हणजे फ़क्त आद्याक्षरावरुन असं मला अपेक्षित नाहीये. आद्याक्षरावरुन नाव ठेवण्याची
प्रथा पडण्यामागे काही कारणं होती. त्याचा आपण आधी मागोवा घेऊ. पूर्वी गावांमध्ये ग्राम उपाध्यय
किंवा ग्राम पुरोहित असत. अगदी लहान गावं म्हंटली तरी ३/४ हजार लोकवस्तीची असत. पूर्वी
कागदाचा शोधही लागला नव्हता. तेव्हा एव्हढ्या सगळ्यांच्या कुंडल्या लक्षात ठेवणं शक्यच नव्हतं
त्यामुळे त्यावेळेच्या विद्वान लोकांनी मार्ग शोधून काढला. प्रत्येक राशीची नक्षत्रे आणि त्यांची चरणे
याप्रमाणे यांना प्रत्येकाला एक एक आद्याक्षर ठरवलं आणि त्याप्रमाणेच नावॆ ठेवण्याचा प्रघात पडला
होता. फ़क्त त्या व्यक्तीचं नाव कळलं की त्या व्यक्तीच्या कुंडलीची बरीचशी माहीती कळत असे ती
माहिती पुढे लग्न जुळवतांना उपयोगी पडत असे. पण आता ही पध्दत सध्याच्या अधुनिक युगात
गरजेची नाही.
मग बाळाचं नाव ठेवायचं असेल तर काय ठेवायचं? तसच कंपनीचं नाव काय असायला हवं?
प्रत्येक व्यक्तीचे नाव हे त्याची ऒळख असते. आपल्याला आपापल्याच नावाने हाक मारली तरच
आपण प्रतिसाद देतो. इतर कोणाच्या नावाने आपल्याला हाक मारल्यास आपलं तिकडे लक्षही जात
नाही. पण आपल्यासारखंच नाव असलेल्या दुसर्या कोणत्या तरी व्यक्तीला कोणीही हाक मारल्यास
आपल्याकडूनही नकळतपणे त्याला प्रतिसाद दिला जातो याचे कारण म्हणजे त्या नावाचे तरंग
आपल्या मनावर तसेच शरीराच्या प्रत्येक भागावर काम करत असतात अणि आपण एकदम त्या
हाकेला प्रतिसाद देतो. ते तरंग आपल्या बारशापासूनच आपल्याला साथ करत असतात.
जसे प्रत्येक नावाचे वेगळे तरंग असतात तसेच प्रत्येक ग्रहांचेही वेगवेगळे तरंग असतात. ज्या ज्या
वेळेस आपल्याला हाक मारली जाते त्या त्या वेळी त्या नावाच्या तरंगाला समरुप असलेले ग्रहसुध्दा
charged up होत असतात. हे ठेवलेलं आपलं नाव जर आपल्या कुंडलीतील महत्वाच्या आणि
आपल्याला अनुकुल असलेल्या ग्रहानुसारच जर ठेवले तर ज्या ज्या वेळी आपल्याला हाक मारली
जाते त्या त्या वेळेस तो ग्रह charged up होतो आणि ते आपल्या भाग्याला अत्यंत पोषक ठरतं.
आणि याच्या बरोबर उलट आपलं नाव जर आपल्या कुंडलीतील दुषित किंवा वाईट फ़ळं देणाऱ्या
ग्रहानुसार असेल तर ते आपल्याला अत्यंत हानीकारक ठरते.
आपल्याला अनुकुल असलेलं आपलं नाव किंवा आपल्या कंपनीचे नाव आपल्याला अंकशास्त्र व
कुंडली यांच्या मदतीने सहज शोधता येतं.
If you like this article please don’t forget to press the like the button.
…………………………………………………………………………………..Astroshodh.
#Numerology#Name#Astrology#Astroshodh#