अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ मे ते २१ मे २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, धनस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.    
फलादेश- रविवार रात्रीपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास करणार असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. छान खरेदी होईल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शनि, लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्य संमिश्र आहे. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. मात्र अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. ज्योतिषी, सर्जन यांना याच काळात विशेष लाभ होतील. काहींना या काळात विम्याद्वारे किंवा वडीलोपार्जित धन मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग येतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र दिवस अनुकूल आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना शक्य. वाहने जपून चालवावीत.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात हर्षल, राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवससुध्दा चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असणार्‍यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारी भावंडांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. नंतरचे दोन दिवस कौटुंबीक सौख्याचे असतील. मन प्रसन्न असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.  मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा काळ अडचणींचा ठरु शकेल. आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवतील. अती आत्मविश्वास या काळात नको. नोकरी करणार्‍यांनी आपल्या वरीष्ठांशी वाद टाळावेत. खेळाडूंनी किंवा व्यायाम करणार्‍या लोकांनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात मंगळ, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, राहू आणि भग्यस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात लाभदायक होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस आपले आरोग्य सांभाळा. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शनि, षष्ठस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जास्त दगदग करु नका. लोकांशी वाद टाळावेत. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभाची शक्यता आहे. मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. या काळात प्रवास नकोत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रासाठी चांगले असतील. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडू शकतील. व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. काहींना धनलाभ होतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदी होईल. काही अचानक खर्चही करावे लागतील. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मात्र बेकायदा असलेली कोणतीही गोष्ट या काळात करु नका. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.  
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात मंगळ, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना चांगले अनुभव येतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. पण ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना हाच काळ खूप फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून  तृतीयस्थानी हर्षल, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. सप्ताह मध्यात व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. नोकरी करणार्‍यांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींची भेट या काळात मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात हर्षल, राहू, तृतिय स्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी लाभयोग होईल याचबरोबर बुधाचाही गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. एखाद्या पौराणिक किंवा ऐतिहासिक वास्तूला भेट द्याल. नंतरच्या दोन दिवसात व्यवसायिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये. खर्च वाढतील. प्रवासयोग येतील. प्रवासात बेकायदा गोष्टी टाळाव्यात. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल काळ आहे. लोकांचे सहकार्य मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)