अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट  ते ७ ऑगस्ट २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मुलांकडून चांगली बातमी ऎकायला मिळेल. भावंडांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, कलाकार व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र कालावधी आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, तृतीयस्थानी सूर्य, बुध,चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक चिंता असतील. नंतर मात्र प्रश्न हळुहळु सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. भावंडांच्या भेटीचे योग शक्य आहेत. कवी, लेखक यांच्यासाठी हा कालावधी मस्त असेल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल. सप्ताह मध्यानंतरसुध्दा आर्थिक लाभ होऊ शकतील. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीच्या कामात यश संभवते. सप्ताहाच्या शेवटी तुमचा प्रभाव लोकांवर राहील. प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे.  मित्रांच्या भेटीचे योग येतील. खिशात पैसे भरपूर खुळखुळत असल्याने चांगली खरेदी कराल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी सप्ताह मध्य चांगला आहे. उपासना चांगली घडेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्याचा काळ असेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लावू शकाल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता त्यांच्याकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने खुश असाल. आवडत्या लोकांची भेट होईल. काही लाभही होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. प्रवास मात्र शक्यतो या सप्ताहात टाळलेलेच बरे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक काळ आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. वरीष्ठ खुश असतील. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. कुटुंबीयांबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. नंतरचे दोन दिवस उपासना करण्याऱ्यांना चांगले आहेत. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काही लाभही होऊ शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असणार आहेत. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांच्यासाठी मात्र हा काळ अनुकूल घटनांना ठरणार आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास शक्य आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीचा काळ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुसंधी देणारा ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. काही लाभही संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकीत करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, अष्टमस्थानात  सूर्य, बुध, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना छान कालावधी आहे. उपासनेसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदारासाठी वेळ द्या. तुमच्या मदतीची गरज त्यांना भासू शकेल. सप्ताहाचा शेवट मानसिक चिंतेचा असू शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी अती दगदग टाळा. घरात वादविवाद होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल. नंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशासाठी जास्त मेहनत करायला लावतील असं दिसतंय. सप्ताह मध्यात आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताहाच्या मध्यात घरात छान वातावरण असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. सप्ताह मध्यानंतर तब्येतीबद्दल काही तक्रारी जाणवतील. संततीबद्दल काळजी वाटत राहील. कलाकार, खेळाडू यांना ग्रहमान कष्टसाध्य अशाप्रकारचे आहे. गुंतवणुक करायची असेल तर नवीन क्षेत्र या काळात निवडू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी नोकरदारांनी वरीष्ठांची नाराजी ओढवेल असे वर्तन टाळावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग तर चंद्राचा मंगळ व गुरुशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्याचा चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला बोलण्यावर संयम ठेवावा. तब्येतीची काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही सुसंधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. सोशल मिडीयावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची या काळात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group