अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ जुलै ते १० जुलै २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात बुध, राहू, तृतीयस्थानात सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दोन दिवस सोडले तर नंतर सप्ताह अनुकूल आहे. सोमवारी दुपारपर्यंत वाहने जपून चालवा. बोलण्यावरसुद्धा संयम या कालावधीत ठेवण्याची गरज आहे. तोंड येणे, डोकेदुखी, मायग्रेन, अ‍ॅसिडिटी अशा उष्णतेच्या आजारांचा त्रास संभवू शकेल. त्यानंतरचे २ दिवस लाभदायक आहेत. एखादा धनलाभ/ बक्षिस/ कोणीतरी केलेले कौतुक उत्साह वाढवतील. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग संभवतात. भावंडांशी संवाद साधाल. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मन प्रसन्न असेल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. केलेल्या कामाचे चीज होइल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. गायकांना व नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना हा कालावधी खुप सुंदर आहे. काही चांगल्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात बुध, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. अचानक एखादा सन्मान/ भेटवस्तू मिळणे/ कोणाकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळणे असे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवटी अचानक खर्च उद्भवतील. नव्या गुंतवणूकीला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य नाही.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात बुध, राहू, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात थोडे जास्त काम करावे लागेल मात्र त्याचं चीजही होईल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. ओळखींमुळे एखादे अडकलेलं कामही मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात बुध, राहू, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात बुध, राहू, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. सप्ताह मध्य विमा संदर्भात काम करणारे, इतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात बुध, राहू, अष्टमस्थानात सूर्य आणि भाग्यस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. कवी व कलाकार यांना ग्रहमान अनुकूल आहे. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात बुध, राहू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानक उद्भवतील. विद्यार्थ्यांना कालावधी प्रतिकूल आहे. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे व केमिस्ट यांना अनुकूल आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे टाळावीत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात बुध, राहू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमी युगुलांसाठीही हा अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरीच्या संधी मिळू शकतील. मात्र तब्येत या काळात सांभाळावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात बुध, राहू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांनी आपले लेखन वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. शेजार्‍यांचा विचित्र अनुभव या काळात येऊ शकेल. एखादी स्पर्धा/ परीक्षा असेल तर त्यात मात्र चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर चांगला कालावधी आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करा आणि आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी बुध, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वेळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी खूप चांगला आहे. या कालावधीत चांगले लेखन होईल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. सप्ताह मध्यानंतर घरात चांगले वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)