अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ एप्रिल ते १ मे २०२१)Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, धनस्थानात राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषत: सर्दी किंवा थंडीमुळे होणार्‍या आजारांपासून जपायला हवे. शत्रुंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपले वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. हातून काहीतरी चांगले लेखन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी काही विचित्र अनुभव येऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. काहींना अचानक धनलाभ शक्य आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंतचा काळ विद्यार्थ्यांना चांगला नाही. यश मिळविण्यासाठी पळवाट काढू नका. त्यानंतरचे २/३ दिवस आरोग्याच्या समस्या जाणवतील. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याबाबतही या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांशी संपर्क होईल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. केलेल्या श्रमाचं चीज होईल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींकडे मनाचा ओढा असेल.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होईल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण प्रसन्न असेल. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल. जुन्या आठवणी ताज्या होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंतवणूक करीत असाल तर त्यासाठी तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्या. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या शक्य आहेत. मधुमेह असणार्‍यांनी पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी संपर्क साधाल किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, कवी, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण छान असेल. आपल्या एखाद्या छंदासाठीही जरुर वेळ द्या. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. बुधवारपर्यंतचा काळ मानसिक चिंता किंवा वैचारिक गोंधळाचा असू शकेल. या काळात प्रवास टाळावेत. आपल्या कोटी करण्याच्या स्वभावामुळे किंवा टोमणे मारण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात शांतता रहावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला पारमार्थिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. मात्र जोडीदाराबरोबर वाद टाळा. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात  सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना मस्त धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या या काळात जाणवण्याची शक्यता आहे. अती थंड पदार्थ खाणे किंवा पिणे या काळात टाळावेत. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. या काळात आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवणे आवश्यक आहे. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहावे. वाहने जपून चालवावीत.  सप्ताहाच्या शेवटी अती दगदग टाळावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे अचानकपणे होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. बुधवारपर्यंतचा काळ धार्मिक कार्यक्रमांसाठी चांगला आहे. लेखक, कलाकार, यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्येही छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या दुखण्याचा काही त्रास असेल तर या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींना मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. सप्ताह मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळू शकेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाची शुक्राशी युती तर शनिचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी केंद्रयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा प्रतियोग अनुक्रमे सूर्य, बुध व शुक्राशी होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. विवाहोत्सूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. गूढ गोष्टींकडे मनाचा कल असेल. काहींना अचानक धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)