अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ मार्च ते २७ मार्च २०२१)Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात बुध, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवास छान फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार/ आर्टीस्ट यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खुप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात बुध, नेपचून, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना चांगला काळ आहे. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सुर शेवटपर्यंत टिकणार आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात बुध, नेपचून, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य धनलाभाचा ठरु शकेल. मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्य शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुश असतील. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील. लेखक, कवी यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात बुध, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला चांगली खरेदी कराल. काही अनावश्यक खर्चही करावे लागू शकतील. गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात मनाला उगीचच कसलीतरी हुरहुर किंवा चिंता लागून राहील. आत्मविश्वासाची कमतरता जाणवत राहील. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही चांगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह अखेरीस छान कालावधी आहे. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात बुध, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. आर्थिल लाभ होतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाचा मध्य छान खरेदीचा ठरु शकेल. परदेशासंबंधीत असलेल्या गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. जोखीम असलेली कामे टाळावीत. विमा प्रतिनिधी तसेच मानसोपचार तज्ञ यांना मात्र हाच काळ फायदेशीर ठरु शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात बुध, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल असू शकेल. आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. आपल्या कामात हलगर्जीपणा करू नका. सप्ताह मध्य चांगला आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभाचे योग येऊ शकतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी छान खरेदी कराल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान फायदेशीर आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे.
उपासना: श्रीराम किंवा विष्णू उपासना या काळात जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात बुध, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने तुमच्यावर वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहेत.  सप्ताह मध्यानंतर काहींना लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी बुध, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. घरात छान वातावरण असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात बुध, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्‍यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, नेपचून, धनस्थानात सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. नोकरी करणार्‍यांनी हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व हर्षलशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी त्रिकोण व शनीशी प्रतियोग होईल. याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. मात्र शेअर्ससारख्या क्षेत्रात गुंतवणूक करायला हा काळ उचित नाही. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)