नोंदणी साठी पुढील लिंकचा वापर करा.
https://astroshodh.com/corona-virus-books/#Corona_Virus_English_Book

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीचे योग आहेत. काही लाभही शक्य आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. रविवार संध्याकाळ ते मंगळवार रात्रीपर्यंत तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. योग्य ती काळजी घ्यावी. नोकरदारांनी कामात हलगर्जीपणा करु नये. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे टाळावीत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल आहे. तब्येतीला जपा. आजारपण अंगावर काढू नका. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हाच काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी पती किंवा पत्नी बरोबर वेळ मजेत जाणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांकडून दर्जेदार लेखन होईल. चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस घरातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूलता जाणवेल. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थी, कलाकार तसेच प्रेमिकांना अनुकूल कालावधी आहे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळावे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्याबाबत विशेष काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस प्रतिकूल असू शकेल. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. डोळयांसंबंधी काही त्रास जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग आणतील. प्रवासाचेही योग येऊ शकतील. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. मनासारखी कामे होतील. लग्न ठरविण्यासाठी किंवा त्यासंबंधी बोलणी करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक सगळ्या गोष्टींमध्ये अनुकूलता जाणवेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. सोमवार व मंगळवार आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. आपल्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर मजेत वेळ जाणार आहे. सप्ताह अखेरीस आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस प्रतिकूल असू शकतो. एखादा खर्च अचानकपणे करावा लागेल असे दिसते. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस छान आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताह मध्यात आरोग्याबाबत काही समस्या जाणवू शकतील. विशेषत: डोळ्यांबाबत जागरूक रहावे. या काळात खाण्यावर व बोलण्यावर संयम जरुर ठेवा. सप्ताह अखेर घरात मस्त वातावरण असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. नंतरचे दोन दिवस खरेदीसाठी चांगले आहेत. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक काही लाभ होऊ शकतील. अध्यात्मिक उन्नत्तीसाठी जे प्रयत्नरत
आहेत त्यांना काही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य आनंदाचा व लाभदायक असेल. एखादा नवीन विषय किंवा कला शिकायला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. सप्ताह अखेरीस अती दगदग टाळावी. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले काहीही या अवधीत करु नका.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस आवडत्या लोकांच्या भेटीचे असतील. चांगले लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास लाभदायक असतील. लेखकांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. सप्ताहाच्या शेवटी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात बुध, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान आहे. रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी संपर्क साधाल. नंतरचे चार दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुष असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या. सोमवार ते गुरुवार काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. काही लाभही या काळात अपेक्षित आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. धनलाभ संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल असू शकतात. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. अचानक काही गोष्टींसाठी खर्च करावा लागू शकतो. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी त्रिकोणयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुधाची गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार दुपारपर्यंत प्रतिकूल ग्रहमान आहे. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी मनाला आनंद देतील. भविष्यात फायदा देऊ शकणार्‍या एखाद्या गोष्टीची सुरुवात या कालावधीत होऊ शकेल. भागीदारीत नविन व्यवसाय सुरु करायला ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेले काम टाळावे. टाळता न येणारे काही खर्च या काळात करावे लागू शकतील. परदेशगमन करण्यासाठी जे लोक प्रयत्नशील आहेत आणि काही अडचणी येत आहेत अशांसाठी काही संधी येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group