साप्ताहिक राशिभविष्य सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे.

    

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

हा सप्ताह आणि अग्नीतत्त्व
आपलं संपूर्ण विश्व पंचतत्त्वांनी बनलेलं आहे. जोपर्यंत या तत्त्वांचा समतोल आहे तोपर्यंत सगळं जग कसं छान, व्यवस्थित, सुरळीत सुरू असतं. निसर्गाची अफाट ताकद आपल्याला एरवी जाणवतही नाही पण त्यातील एखादं तत्त्व वाढलं की असमतोल निर्माण होतो आणि मग निसर्गाचा कोप होतो आणि आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत याची जाणीव होते. या सप्ताहातही असेच काहीसे जाणवण्याची शक्यता आहे. या सप्ताहात अग्नीतत्त्वाचे आधिक्य असणार आहे. त्यामुळे या सप्ताहात आग, युध्दजन्य स्थिती, जनक्षोभ, अपघात, भूकंप अशा गोष्टी शक्य आहेत. शक्य असल्यास खूप गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रवासही टाळावेत.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात निर्यातीच्या व्यवसायात फ़ायदा होईल. नृत्यकलेशी संबंधितांनासुध्दा अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नका. या काळात राग, चीडचीड ही दीर्घकाळासाठी नुकसानदायक ठरु शकेल. काहींना या कालावधीत मायग्रेन, डोकेदुखी, पित्तविकारांचा त्रास होऊ शकेल. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. आपल्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस जुन्या मित्रांची भॆट शक्य आहे. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्य व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंतचा काळ आपल्याला फारसा अनुकूल नाही. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू नये म्हणून योग्य ती काळजी घ्या. पायाला दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्या. जोडीदाराशी वाद टाळावेत व  जोडीदाराचे आरोग्य या काळात सांभाळावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन निराशावादाने ग्रासणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. मानसोपचार तज्ञ, इतिहासकार तसेच विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सप्ताह मध्यात आपल्या कामात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले प्रतिस्पर्धी, हितशत्रू यांच्यावर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. काही अनपेक्षित लाभ होतील मात्र एखाद्या मित्राच्या/ आप्ताच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. आपली व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. भागीदारीसाठी काही प्रस्ताव या काळात आले तर ते कितीही आकर्षक दिसत असतील तरी लगेच मान्यता देऊ नका. हा पूर्ण सप्ताह जाऊ द्या. नंतर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा. सप्ताह मध्य व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंतचा काळ आपल्या कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग निर्माण करू शकेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. जोखीम असलेले कोणतेही काम या कालावधीत करू नका. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल. नवीन काही शिकायचे असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. आपल्या छंदांनाही या कालावधीत जरूर वेळ द्या. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी जाणवत रहातील. त्यानंतरचे दोन दिवस  जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय असल्यास काही फायदेशीर व्यवहार होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर अपघातभय आहे. प्रवास शक्यतो टाळवेत. जोखीम असलेले कोणतेही व्यवहार या काळात नकोत. मूळव्याध किंवा उष्णतेच्या विकारांचा त्रास संभवतो. अती तिखट पदार्थ खाणे या काळात टाळवेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या सप्ताह अखेरपर्यंत घेऊ नका. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी धनलाभाचे योग शक्य आहेत.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. मात्र नोकरीच्या प्रयत्नात असलेल्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: काळभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना चांगला कालावधी आहे. आपल्या कार्याची प्रशंसा लोक करतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवू शकेल. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल.  १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही खरेदी कराल किंवा काही खर्च अचानकपणे पुढे येतील ते टाळता येणार नाहीत. मनाला एक प्रकारची विचित्र हुरहुर लागून राहील. डोळे किंवा दातांच्या समस्या या काळात जाणवतील. आपल्या बोलण्यावर या काळात नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या मध्यात प्रवास टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांचे विचित्र अनुभव या काळात येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सुर्य, शनि व गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला मंगळाची हर्षलशी युती होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी व हर्षलशी युती आणि गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. सप्ताह मध्य चांगला आहे. काही धनलाभ होऊ शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर डोळ्यांचे काही त्रास किंवा तोंड येणे असे उष्णतेचे त्रास संभवतात. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कळत नकळत लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांच्यासाठी काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group