अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० जानेवारी ते १६ जानेवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक कृत्ये किंवा उपासना करण्यासाठी चांगले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा रुबाब वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. सोमवार व मंगळवार हे दिवस प्रतिकूल आहेत. वाहने जपून चालवा. जोखीम असलेले व्यवहार टाळा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, सर्जन या लोकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. तुमचे कोणी गुरु असतील किंवा गॉड फादर असतील तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने एखादे काम पटकन होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्य बाबत काही तक्रारी जाणवतील. ज्यांना ॲसिडीटी किंवा पोटाचे काही व्याधी असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी. सोमवार व मंगळवार हे दिवस जोडीदाराबरोबर मजेत जातील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम असलेले व्यवहार टाळा. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी प्रवास टाळा. घरातल्या वडीलधारी मंडळींशी वाद घालू नका तसेच आपली धार्मिक मध्ये दुसऱ्यांवर लादू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काही लाभ होतील. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाला पर्याय नाही. पळवाट शोधू नका. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. फार्मासिस्ट व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर  आवडत्या मंडळींबरोबर वेळ छान घालवता येईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद नको. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर दुर्लक्ष करु नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मौजमजा करण्यात तसेच आराम करण्यात घालवाल. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप किंवा कौतुकाचे शब्द उत्साह वाढवतील. सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील विशेषतः वाताचे विकार व हाडाचे संबंधी काही दुखणे असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद घालू नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कर्तुत्वाला वाव देणारा काळ आहे. हातून चांगले लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गृहसजावट किंवा घराच्या दुरुस्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरात प्रसन्न वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी नशिबाची साथ चांगली लाभणार आहे कमी श्रमात जास्त लाभ होतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतियस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. प्रवास सुखकर होतील. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांच्याकडून चांगले लिखाण होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात सूर्य, शुक्र, तृतियस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द प्रसंग घडणे शक्य आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. मायग्रेन किंवा अ‍ॅसिडीटी असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर भावंडांची खुशाली कळेल. काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम काळ असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्र-मैत्रिणींच्या भेटी आनंद देतील. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ होऊ शकेल. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. मात्र पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभही संभवतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर बेकायदा व्यवहार टाळा.  सप्ताहाच्या शेवटी आहारावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो  अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतियस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला बुधाची शनिशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाची गुरुशी युती होईल. १३ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची शनिशी युती होईल याचबरोबर मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची अनुक्रमे बुधाशी व गुरुशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळ, शुक्र व हर्षलशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group