अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घावी. वकील व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेर जोडीदाराच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र काळ आहे. घरातील वातावरण चांगले राहील याची काळजी घ्यावी. ज्योतिषी, विमा व्यावसायिक, मानसोपचार तज्ञ यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी अनुकूल आहे. मात्र असे असले तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. शेअर्स, कमोडिटी सारख्या गोष्टींपासून थोडाफार फायदा संभवतो. मात्र मोठी गुंतवणूक सध्या नको. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, आहारतज्ञ यांना अनुकूल ग्रहमान आहे. जोखीम असलेली कामे टाळा.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. प्रवास लाभदायक होण्याची शक्यता आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. लेखक, वक्ते यांना अनुकूल ग्रहमान आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना विवाह ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण छान असेल. एखादी पार्टी/ समारंभाचं आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. कलाकार, खेळाडू, विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांसाठीसुध्दा अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता या काळात आहे. काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्याही जाणवू शकतात. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. प्रवासयोग येतील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी यांना चांगला कालावधी आहे. काहींना भावंडांकडून लाभ संभवतात. सप्ताह अखेर घरगुती प्रश्नांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी कालावधी अनुकूल नाही. प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करणार असाल तर योग्य व्यक्तीचा सल्ला अगोदर जरुर घ्यावा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात आत्मविश्वास वाढविणारी ठरेल. नविन विषय शिकायची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. मुलांचे काही प्रश्न असतील तर तिकडे जरुर लक्ष द्या. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्याही जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. काहींना धनलाभ होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. परदेश प्रवास ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. शेअर्समध्ये थोडीफ़ार गुंतवणूक तज्ञांच्या सल्याने करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. गायक/ कलाकार यांना चांगला काळ आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार फायदेशीर होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, तृतियस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कार्यक्षेत्रात छान काम होईल. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी चैन करावीशी वाटेल. आपले पैसे/ चीजवस्तू सांभाळा. गायक, लेखक, कवी, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना मात्र हा काळ फायदेशीर आहे.
या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, धनस्थानात सूर्य, बुध, तृतियस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. आप्तेष्टांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. कमिशन एजंट/ विमा प्रतिनिधी, ट्रेडर्स यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळा चांगला आहे. काही धनलाभ या काळात होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात गुरु, शनि, प्लूटो, तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ तसेच उपासना करणार्‍यांसाठी हा काळ चांगला आहे. काहींना प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. वरीष्ठांकडे काही मागणी करायची असेल तर हा काळ योग्य असेल. सप्ताह मध्यानंतर आवडत्या व्यक्तींच्या भेटी आनंद देतील. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून काही लाभ शक्य आहेत.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. बेकायदेशीर कामे या कालावधीत टाळावीत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना अचानक धनलाभ सुखावतील. प्रवासाचे योगही येऊ शकतात. न्यायाधीश, पुरोहीत व शिक्षक यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस नोकरीच्या ठिकाणी कामात दीरंगाई किंवा कुचराई करु नका. वरिष्ठांकडून तुमच्या नावडत्या कामांसाठी तुमची निवड होऊ शकेल. व्यवसायात मोठी जोखीम सध्या घेऊ नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो  अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. काहींना धनलाभही होऊ शकतील. भागीदारीत नव्याने व्यवसाय सुरु करायला अनुकूल ग्रहमान आहे.  सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. वाहवे जपून चालवावीत. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटी आनंद देतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतियस्थानी राहू, भाग्यस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल, चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी केंद्रयोग आणि शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल व बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल आहे. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. काही लाभ या काळात आनंद देतील. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर कटकटीचा असू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा, मानसोपचारतज्ञ, ज्योतिष या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी मात्र अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group