अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१)  Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश-सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना पती/ पत्नीच्या संदर्भातील शुभ वार्ता समजतील. विवाह ज्यांना ठरवायचा आहे त्यांना हा काळ विशेष अनुकूल आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होता होता राहून जायची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर या काळात संयम ठेवलेला बरा. सप्ताह मध्यानंतर लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. काही खर्च अचानकपणे समोर येऊ शकतील. तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळणार आहे. थोडा वेळ स्वत:साठीही जरुर काढा. घरातील बिलंवित कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, ब्लॉगर्स, कवी व गायक यांना चांगला काळ आहे. या काळात काहींना प्रवासयोगही आहेत.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. कलाकारांना व प्रेमिकांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. काही धनलाभ होतील.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकते.  व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर काही अपेक्षित असलेले लाभ विनाकारण लांबण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करणे टाळा.  परदेशाशी संबंधीत काही कामे मार्गी लागू शकतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, तृतियस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईन्शुरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, धनस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर या काळात फ़ायद्याचे प्रमाण वाढेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास करणार असाल तर प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काही धनलाभ या काळात अपेक्षित आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना लाभदायक काळ आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. आपल्या छंदासाठी वेळ जरूर काढा. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराला लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतियस्थानी राहू, भाग्यस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला गुरु व चंद्राचा त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा व बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु, शनि व प्लूटोशी प्रतियोग होईल. १ जानेवारीला बुधाचा नेपचूनशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group