अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०)  Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रतिकूल कालावधी आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने हळू चालवावीत. विमा प्रतिनिधी, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. उपासना करण्यासही हा कालावधी चांगला आहे. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकूल असेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत व्यतीत कराल. जोडीदाराकडून काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. भागीदारीतल्या व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. १४ तारखेला संध्याकाळी जोडीदाराबाबत काही चिंता जाणवतील. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा ठरु शकेल. या काळात वाहने जपून चालवा. जोखीम असलेली कामे टाळा. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास प्राप्त होऊ शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात काही आरोग्याच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र लाभदायक ग्रहमान आहे. आहारतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. वाद वाढणार नाहीत याची काळजी घेतलेली बरी. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांनी आपल्या भागीदाराला या काळात गृहीत धरु नये. गैरसमज व्हायला छोट्या गोष्टीसुध्दा पुरतात हे लक्षात ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करू नका.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारामधून चांगला फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही मोठी जोखीम घ्यायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमिकांनाही हा कालावधी चांगला आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र आहे. जास्त दगदग या काळात करू नका. हातातली कामे लवकर संपवून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. आपल्या वागण्याने किंवा बोलण्याने घरातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला नाही. यश मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होईल. मुलांच्या काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. वकील किंवा कायदेविषयक कामे करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने  खुश असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. दिनांक १४ व १५ प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्री-साठी ग्रहमान अनुकूल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यशासाठी झगडावे लागू शकेल. शेअर मार्केट किंवा कमोडिटीसारख्या क्षेत्रात सध्या जोखीम पत्करू नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, तृतियस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडिटी, पोटाच्या किंवा डोळ्यांसंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची चांगली मदत मिळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, धनस्थानात प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८  तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही लाभदायक घटना संभवतात. नवनवीन विषयांच्या अभ्यासाची आवड निर्माण होईल. थोडा वेळ आपल्या छंदांसाठी जरूर द्यावा.  सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. चमचमीत पदार्थ खाणे तुम्हाला आवडते. घरात छानशी पार्टी करायला हरकत नाही. मात्र खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. ज्यांचा व्यवसाय फ़िरस्तीचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान चांगले असणार आहे. घर किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींच्या खरेदीसाठी अनुकूल कालावधी आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहा. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटीचे योग येतील. १४ व १५ तारखेला एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. सोशल मिडियावर काही पोस्ट करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. नृत्यकलेशी संबंधितांना तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काही लाभ होऊ शकतात.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. काहींना मात्र अचानक बदली किंवा नोकरीच धोक्यात येण्यासारख्या प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकेल. व्यावसायिक लोकांना एखादा लाभ होता-होता राहून जाऊ शकेल. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर किंवा आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखाल. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे. परदेशासंबंधीत व्यावसायिकांसाठीही चांगला कालावधी आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची चंद्राशी व चंद्राची बुधाशी युती आणि शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल तसेच सूर्यग्रहण होईल. १५ तारखेला बुधाचा मंगळाशी त्रिकोण व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि चंद्राची गुरुशी व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवास या काळात टाळावेत. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकललेली चांगली. सप्ताह मध्यात आपल्या वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)