अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२०) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
रविवार दुपारपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवासाला जाणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. गाडीची कागदपत्रे जवळ बाळगा. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य चांगला असेल. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
रविवारी दुपारपर्यंत आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे बेत ठरतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
रविवारी दुपारपर्यंतचा वेळ लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी आपल्या गुप्तशत्रूंवर नजर ठेवा. वरीष्ठांना दुखवू नका. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. वाहने जपून चालवावीत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस संमिश्र घटनांचा ठरु शकेल. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीच्या काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा त्वचाविकार असणार्‍यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण घालवू शकाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला असणार आहे. रविवारी घरातील वातावरण चांगले राहील. नंतरचे दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडणार आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. मात्र अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. नोकरी करणार्‍यांनी आपल्या वरीष्ठांशी वाद टाळावेत. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खेळाडूंनी किंवा व्यायाम करणार्‍या लोकांनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतील. काळजी घ्यावी.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. एखाद्या सभा-समारंभात सामिल होऊ शकाल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागू शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. मुलांच्या बाबतीतली चांगली बातमी कळेल. प्रेमिकांनाही अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. विशेषत: अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी संवाद साधाल. शेजार्‍यांचे काही चांगले अनुभव येऊ शकतात. लेखक, साहित्यिक, प्रकाशक यांना ग्रहमान चांगले आहे. प्रवासयोग शक्य. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. घरात चांगले वातावरण असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक घटनांचे ठरु शकतील. एखद्या नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. एखादं बक्षिस, शाबासकी किंवा कौतुकाचे शब्द तुम्हाला ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात व सप्ताह अखेरपर्यंत काही धनलाभाचे योग आहेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदीचे योग संभवतात. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताह मध्यात आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह अखेरीस कुटुंबीय किंवा मित्रमंडळींबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना उपासनेत खंड पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. डोके, डोळे व पायांना जपावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि, अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. त्याचा जास्तीत जास्त फ़ायदा तुम्ही घ्याल. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस पाय/ घोटा यासंबंधी त्रास संभवतो. महत्वाची खरेदी या काळात करु नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला सुर्याची चंद्राशी युती व गुरुशी लाभयोग होईल आणि चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सुर्य वृश्चिक राशित व शुक्र तुळ राशित प्रवेश करतील. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला सुर्याचा चंद्राशी व शनिशी लाभयोग आणि चंद्राची गुरु व शनिशी युती होईल २० तारखेला गुरु मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होतील. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास लाभदायक होतील. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात नविन विषयाचा अभ्यास करावासा वटेल. वडीलांकडून किंवा वडीलधारी व्यक्तींकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जुने मित्र भेटतील. धनलाभ होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)