अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२०)   (Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, धनस्थानात राहू, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु, केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखिम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र गरज असेल तरच प्रवास करावा. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात कुचराई करु नका. आपले वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन टाळावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, तृतियस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु, केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री), हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवत रहातील. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराशी वाद टाळावेत. पती/ पत्नीला वेळ द्या. आपापसात काही वाद असतील तर लवकरात लवकर कसे मिटतील ते बघा. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवावीत. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. मात्र आपली धार्मिक मते इतरांवर लादू नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु, केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नविन नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.  मात्र अ‍ॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असेल त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर आपल्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु, केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला घरात प्रसन्न वातावरण असेल. छान खरेदीचे योग येऊ शकतात. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. मौज मजा करण्याकडे कल असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. वैद्यकिय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु, केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि दशमस्थानात राहू व व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांशी वाद टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त ठरेल असे काहिही शेअर करु नका. प्रवास शक्यतो या काळात नकोत. सप्ताहाच्या मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. प्रॉपर्टीच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे मात्र तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात गुरु, केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, भाग्यस्थानात राहू आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात चांगल्या घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्य प्रतिकूल आहे. वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर आपल्या लिहिण्यामुळे वाद होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्या. भावंडांशीही या काळात वाद होऊ शकतात. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर मनाला दिलासा देणार्‍या घटना घडतील. विद्यार्थांना यश मिळेल मात्र थोडे कष्ट अधिक घ्यावे लागतील. नवीन गुंतवणूक करत असाल तर पुरेशी काळजी घेणे अपेक्षित आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु, केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, अष्टमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली जांणार आहे. आपला आत्मविश्वास वाढीला लावणारे ग्रहमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम होईल. मात्र आपल्या जोडीदाराशी वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या बाबतीत प्रतिकूल काळ आहे. श्वसनाचे ज्यांना त्रास आहेत त्यांनी शुक्रवार संध्याकाळनंतर पुरेशी काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु, केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, सप्तमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. अचानक एखादा खर्चही करावा लागू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी चांगलं ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. सासुरवाडीबद्दल चांगली बातमी कळेल. नृत्यकलेशी संबंधीत असणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. त्यांच्याशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. काहींना लाभाचे योग शक्य आहेत. आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात संततीसाठी वेळ काढावा लागेल. खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी डोळे किंवा दात यांच्या काही समस्या जाणवू शकतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, पंचमस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात गुरु, केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. मात्र कागदपत्रे तज्ञांकडून जरुर तपासून घ्यावेत नंतरच व्यवहार करावेत. मित्रांची किंवा आप्तेष्ठांची वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, चतुर्थस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात गुरु, केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीच्या ठिकाणी कामात कुचराई करु नका. तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. ऑफ़िसच्या कामासाठी प्रवासयोग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, तृतियस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु, केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व हर्शलशी प्रतियोग होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी आणि चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राची आधी गुरु व नंतर शनि व प्लुटोशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीची मदत किंवा मार्गदर्शन या काळात मिळू शकेल. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी थोडे अधिक परीश्रम करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)