अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० ऑगस्ट  ते ५ सप्टेंबर २०२०)

(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्शल, तृतियस्थानी शुक्र व राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
पूर्ण सप्ताह भाग्यकारक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप मिळू शकते. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह अखेरीस मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराला एखादं छानसं प्रेझेंट देऊन खूश करु शकाल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. मात्र प्रवासात अडथळे येऊ शकतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होईल. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ होता होता राहून जाऊ शकतो. एखद्या मित्र किंवा नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. ज्योतिष, अध्यात्म अशा गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र व राहू, तृतियस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, आणि लाभस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीला मनाविरुध्द घटना शक्य आहेत. नियोजित कामांमध्ये दीरंगाई होईल. मात्र विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. सप्ताह अखेरीस विवाहोत्सुक लोकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्शल, आणि व्ययस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यानंतर अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तुमच्या तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्शल आणि लाभस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना व वकिलांना हा काळ चांगला आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करीत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषाचा, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्शल, दशमस्थानात शुक्र व राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. काहींना धनलाभ शक्य आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्शल, आणि भाग्यस्थानात शुक्र व राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल आहे. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना मात्र हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्शल, अष्टमस्थानात शुक्र व राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्शल, आणि सप्तमस्थानात शुक्र व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्शल, षष्ठस्थानात शुक्र व राहू, अष्टमस्थानात सूर्य, बुध,  आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्‍या काही घटना शक्य आहेत. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांनी भरलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठीही हा कालावधी चांगला आहे. मात्र डोळ्यांची व दातांची या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाचा शेवट कलाकार/ कवी यांना चांगला आहे. सोशल मिडियावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्शल, पंचमस्थानात शुक्र व राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध,  लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. काही अचानक खर्चही या काळात उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात उगीचच काही गोष्टींची चिंता मनाला लागून राहील. बेकायदा गोष्टींपासून या काळात लांबच राहीलेले बरे. सप्ताह अखेरीस मित्रमंडळी/ आवडत्या लोकांची भेट होऊ शकेल. एखादा धनलाभ सुखवून टाकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ, हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र व राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्राचा कर्क राशित प्रवेश होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी शनिचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. विशेषत: वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्‍यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस मनासारखी कामे झाल्याने खुश असाल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)