अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ मार्च ते २८ मार्च २०२०)    astrologerinpune, vastuconsultantinpune

या सप्ताहात मराठी नविन वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा! सर्वांना आरोग्य, सुखेशांती, समाधान, संपन्नता लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना. उद्या २२ मार्च रोजी होणार्‍या जनता कर्फ़्यूमधे मी सहभागी होत आहे. आपणाही सर्वांनी यात सहभागी होऊन करोनाला सर्वांच्या जिवनातून हद्दपार करावे ही कळकळीची विनंती!

मेष रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू, दशमात शनि व प्लुटो, लाभात बुध व नेपचून आणि व्ययात रवि अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात (Work in office / Work from home) चांगलं काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. काही लाभही अपेक्षित आहेत. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी चांगला आहे. आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे. खर्च करतांना थोडं भान या काळात ठेवणं गरजेचं आहे. सप्ताह मध्यानंतर घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही प्रलंबित कामे असल्यास त्यांना प्राधान्य द्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू, भाग्यात शनि व प्लुटो, दशमात बुध, नेपचून, लाभात रवि आणि व्ययात शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात (Work in office / Work from home) विरोधी परीस्थितीचा/ अडचणींचा सामना करावा लागू शकेल. कामात दिरंगाई किंवा चुका होणार नाहीत तसेच वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गूढ विषयांचं आकर्षण वाटत राहील. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर बेकायदा व्यवहारापासून लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. भावंडांशी वाद टाळा. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न असेल. अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू, अष्टमात शनि व प्लुटो भाग्यात बुध, नेपचून, दशमात रवि, लाभस्थानी शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रातील आपल्या हितशत्रूंकडे लक्ष ठेवा. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादी कौतुकाची थाप/ एखादं बक्षिस किंवा एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रवासयोग आहेत. मात्र प्रवास या काळात टाळलेलेच बरे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू, सप्तमात शनि व प्लुटो, अष्टमात बुध, नेपचून, भाग्यात रवि, दशमात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. त्वचा, वातविकार किंवा हाडांसंबधी काही त्रास जाणवू शकतील. सप्ताह मध्यात भाग्यकारक घटना शक्य आहेत. अध्यात्म, न्यायक्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर छान काम केल्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू , षष्ठात शनि व प्लुटो, सप्तमात बुध, नेपचून, अष्टमात रवि, भाग्यात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यानंतर प्रवास करणार असाल तर काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक असेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू, पंचमात शनि व प्लुटो, षष्ठात बुध, नेपचून, सप्तमात रवि, अष्टमात शुक्र, हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. ईंशुरन्स संबंधी कामे करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत. लाभदायक कालावधी आहे. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू, चतुर्थात शनि व प्लुटो, पंचमात बुध, नेपचून, षष्ठात रवि, सप्तमात शुक्र, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू, तृतिय स्थानात शनि व प्लुटो, चतुर्थात बुध, नेपचून, पंचमात रवि, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. काही तातडीच्या दुरुस्तीसाठी वेळ व पैसा खर्च होईल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. आपल्या छंदाला जरुर वेळ द्या. तुमचे छंद तुम्हाला आनंद मिळवून देतील. शेअर्स, कमोडिटीसारख्या ठिकाणी नविन गुंतवणूक करणार असाल तर जरा जपून व तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा. सप्ताह मध्यानंतर अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू, धनस्थानी शनि व प्लुटो, तृतियस्थानात बुध, नेपचून, चतुर्थात रवि, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र खूप चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मुलांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि व प्लुटो, धनस्थानी बुध, नेपचून, तृतियस्थानात रवि, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नवनविन पदार्थ बनविण्याची व खाण्याची इच्छा पुरवून घ्याल. तोंड येणे किंवा डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या किरकोळ तक्रारी जाणवतील. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. लेखक, वक्ते व कवी यांच्यासाठी चांगला असेल. भावंडांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, नेपचून, धनस्थानी रवि, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू  आणि व्ययस्थानी शनि व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही गोष्टींची चिंता वाटत राहील. काही अचानक उद्भवलेले खर्च त्रासदायक वाटतील. सप्ताह मध्यात चिंता कमी होतील. काही धनलाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यानंतर भावंडांशी/ शेजार्‍यांशी वाद टाळावेत. वादग्रस्त लिखाणही टाळावे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू, लाभस्थानी शनि व प्लुटो आणि व्ययस्थानी बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल लगेच त्याची प्लुटोशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला रवि व चंद्राची युती होईल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. चंद्राचा गुरुशी २५ तारखेला तर मंगळ, शनि, हर्षल व प्लूटोशी तारखेला २६ केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला गुरु-चंद्र व गुरु-शुक्र त्रिकोणयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक उद्भवलेल्या एखादा खर्चही करावा लागू शकतो. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी त्रासदायक ठरणार आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. प्रवासयोग आहेत मात्र प्रवास या काळात ताळलेलेच बरे सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस भावंडांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबीयांसमवेत वॆळ छान व्यतीत होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)