अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ मार्च ते २१ मार्च २०२०) 

मेष रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू,  दशमात शनि व प्लुटो, लाभात बुध व नेपचून आणि व्ययात रवि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
रविवारी मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत वाहने सावकाश चालवा. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक कृत्ये किंवा उपासना करण्यासाठी चांगले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा रुबाब वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू, भाग्यात शनि व प्लुटो, दशमात बुध, नेपचून, लाभात रवि आणि व्ययात शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
रविवारी जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. सोमवार, मंगळवार हे दिवस प्रतिकूल आहेत. वाहने जपून चालवा. जोखीम असलेले व्यवहार टाळा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, सर्जन या लोकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. तुमचे कोणी गुरु असतील किंवा गॉड फादर असतील तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने एखादे काम पटकन होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू, अष्टमात शनि व प्लुटो भाग्यात बुध, नेपचून, दशमात रवि, लाभस्थानी शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवतील. ज्यांना ॲसिडीटी किंवा पोटाचे व्याधी असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी. सोमवार व मंगळवार हे दिवस जोडीदाराबरोबर मजेत जातील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम असलेले व्यवहार टाळा. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी प्रवास टाळा. तसेच घरातल्या वडीलधारे मंडळांची वाद घालू नका. आपली धार्मिक मध्ये दुसऱ्यांवर लादू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू, सप्तमात शनि व प्लुटो, अष्टमात बुध, नेपचून, भाग्यात रवि, दशमात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काही लाभ होतील. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाला पर्याय नाही. पळवाट शोधू नका. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. फार्मासिस्ट व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आवडत्या मंडळींबरोबर वेळ छान घालवता येईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद नको. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर दुर्लक्ष करु नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू , षष्ठात शनि व प्लुटो, सप्तमात बुध, नेपचून, अष्टमात रवि, भाग्यात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
रविवारचा दिवस मौजमजा करण्यात तसेच आराम करण्यात घालवाल. नंतरचे दोन दिवस लाभदायक रहाणार आहेत. एखादा धनलाभ अपेक्षित आहे. वरिष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप किंवा कौतुकाचे शब्द उत्साह वाढवतील. सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. विशेषतः वातविकार व हाडासंबंधी काही दुखणे असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद घालू नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू, पंचमात शनि व प्लुटो, षष्ठात बुध, नेपचून, सप्तमात रवि, अष्टमात शुक्र, हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कर्तुत्वाला वाव देणारा काळ आहे. हातून चांगले लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गृहसजावट किंवा घराच्या दुरुस्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरात प्रसन्न वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी नशिबाची साथ चांगली लाभणार आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू, चतुर्थात शनि व प्लुटो, पंचमात बुध, नेपचून, षष्ठात रवि, सप्तमात शुक्र, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. प्रवास सुखकर होतील. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांच्याकडून चांगले लिखाण होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू, तृतिय स्थानात शनि व प्लुटो, चतुर्थात बुध, नेपचून, पंचमात रवि, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द प्रसंग घडणे शक्य आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. मायग्रेन किंवा अ‍ॅसिडीटी असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर भावंडांची खुशाली कळेल. काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू, धनस्थानी शनि व प्लुटो, तृतियस्थानात बुध, नेपचून, चतुर्थात रवि, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि व प्लुटो, धनस्थानी बुध, नेपचून, तृतियस्थानात रवि, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मात्र मित्रांशी वाद टाळावेत. तब्येतीकडे लक्ष द्यावे. अ‍ॅसिडिटी/ पोटाचे काही त्रास जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर बेकायदा व्यवहार टाळा. काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी आहारावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, नेपचून, धनस्थानी रवि, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू  आणि व्ययस्थानी शनि व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू , लाभस्थानी शनि व प्लुटो आणि व्ययस्थानी बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची मंगळ, गुरु व शनिशी युती होईल. १९ तारखेला शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व मंगळ-गुरु यांची युती होईल २१ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)