अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ मार्च ते ७ मार्च २०२०)  

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू,  दशमात शनि व प्लुटो, लाभात बुध, रवि व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात भाग्यवर्धक असेल. घरात एखादा छानसा कार्यक्रम किंवा पार्टी आयोजित करायला हरकत नाही. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताहाचा मध्य प्रवासासाठी चांगला असेल. प्रवास फ़ायदेशीर ठरेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. धनलाभाचेही योग आहेत. लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. हातातील काम लवकर संपवून आराम/ मौज-मजा करण्याकडे कल असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू , भाग्यात शनि,  व प्लुटो, दशमात रवि, बुध, नेपचून आणि व्ययात शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली असेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. मात्र आरोग्याच्या काही समस्या या दरम्यान जाणवतील. सप्ताहाचा मध्य खूप छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यापासून धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यावसायिंकांना यशदायक व फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संपर्क साधाल. लेखक, साहित्यिक व ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू , अष्टमात शनि व प्लुटो भाग्यात रवि, बुध, नेपचून, लाभस्थानी शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. भाग्यवर्धक योग आहेत. सप्ताहाची सुरुवातच एखाद्या छानशा धनालाभाने होईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य भाग्यवृद्धीचा आहे. तुमचा कोणी गॉडफादर असेल तर त्याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. सासरकडील नातेवाईंच्या भॆटीची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट मिष्टान्न भोजनाचा असेल. मात्र आहारावर नियंत्रण ठेवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू , सप्तमात शनि व प्लुटो, अष्टमात रवि, बुध, नेपचून, दशमात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
रविवारी सकाळी तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. धनलाभाचे योग आहेत. वरिष्ठ खुश असतील. पदोन्नती किंवा पगारवाढ यासाठी प्रयत्न करीत असाल तर अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी खरेदी होईल मात्र कसली तरी चिंता मनाला लागून राहिलेली असेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा असेल. सप्ताहाचा शेवट चांगला असेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू , षष्ठात शनि व प्लुटो, सप्तमात रवि, बुध, नेपचून, भाग्यात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. व्यावसायिकांना चांगले ग्रहमान आहे. ज्यांचा व्यवसाय वडिलार्जित किंवा पारंपारिक आहे त्यांना हा काळ विशेष फायदेशीर आहे. सप्ताह मध्य जोडीदारासाठी चांगला आहे. ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू , पंचमात शनि व प्लुटो, षष्ठात रवि, बुध, नेपचून, अष्टमात शुक्र, हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल घटनांनी होऊ शकते. जोखीम असलेली कामे करू नका. कुटुंबियांशी वाद टाळा. धार्मिक गोष्टींसाठी मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. वादविवाद टाळा. कोर्टकचेरीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. मात्र ज्यांना नोकरीबदल करायचा असेल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल असेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक असेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू , चतुर्थात शनि व प्लुटो, पंचमात रवि, बुध, नेपचून, सप्तमात शुक्र, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावे. जोडीदाराच्या काही मागण्या असतील तर जरूर विचार करा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला अंधारात ठेवून कोणतीही गोष्ट या काळात करु नये. अन्यथा त्याचे परीणाम दीर्घकालीन व नुकसान करणारे असू शकतील. सप्ताह मध्य अनुकूल घटनांचा आहे. विद्यार्थी, कलाकार, शिक्षक व न्यायाधीश यांना अनुकूल ग्रहमान आहे. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील. आपल्या एखाद्या छंदाला जरूर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू , तृतिय स्थानात शनि व प्लुटो, चतुर्थात रवि, बुध, नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. तुमच्या्त व तुमच्या जोडीदारात काही वाद असतील तर ते वाढू देऊ नका. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेले कामे करू नका. प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मात्र हा काळ काही लोकांना भविष्यातील घटनांचा सूचक असू शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य. भाग्यवर्धक घटना घडतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू , धनस्थानी शनि व प्लुटो, तृतियस्थानात रवि, बुध, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीनी प्रतिकूल आहे. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, फिजिकल फिटनेस क्षेत्रातील लोक, वकील तसेच फार्मासिस्ट यांना हाच कालावधी उत्तम असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. लेखकांना व प्रकाशकांना कालावधी चांगला आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल ठरू शकतो. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. ज्योतिषी, इतिहासकार व मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ यशदायक असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि व प्लुटो, धनस्थानी रवि, बुध, नेपचून, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
रविवारी सकाळी घारातील व्यक्तींबरोबर वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर मंगळ्वार रात्रीपर्यंत छान कालावधी आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना हा काळ उत्तम आहे. एखादा धनलाभ या काळात आपल्याला होऊ शकतो. सप्ताह मध्यातही काहींना धनलाभाचे योग आहेत. कर्जप्रकरणे मंजूर होतील मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अतिथंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, नेपचून, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू  आणि व्ययस्थानी शनि व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासयोग येतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल कालावधी आहे. घरात आनंदी वातावरण असेल. शेजार्‍यांचा एखादा चांगला अनुभव या काळात येईल. सप्ताह मध्यात कमी कष्टात जास्त पैसा मिळेल. एखादे बक्षिस किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू , लाभस्थानी शनि व प्लुटो आणि व्ययस्थानी रवि, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ मार्चला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनि व प्लूटोशी त्रिकोणयोग होईल. २ मार्चला रवीचा चंद्राशी केंद्रयोग होईल. ३ मार्चला शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. बुधाचाही शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि गुरूशी प्रतीयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग तर शनीशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आनंददायक असेल. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रवासयोग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे. लेखक व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांची मदत मिळेल. सप्ताह मध्यामध्ये खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. गृहसजावटीसाठी काही खर्च करावा लागेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #astrologer #astrologymemes #astro #astrologyposts #numerology #vastu #follow  #राशिभविष्य #ज्योतिषशास्त्र #अ‍ॅस्ट्रोशोध #भविष्य #ज्योतिषी #astrologerinpune

Posted by | View Post | View Group