अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ जानेवारी ते १ फ़ेब्रुवारी २०२०)   

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यात गुरु, केतू व प्लुटो, दशमात रवि, बुध, शनि आणि लाभात शुक्र व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील. धनलाभ होईल. सप्ताह मध्यात मस्त खरेदी कराल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपुन चालवा. जोखिम असलेले काम टाळा. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात गुरु, केतू व प्लुटो, भाग्यात रवि, बुध व शनि, दशमात शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. काही लाभ होतील मात्र काही लाभ होता होता राहून जातील. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात गुरु, केतू व प्लुटो, अष्टमात रवि, बुध व शनि भाग्यात शुक्र, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होऊ शकेल. प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे इष्ट राहील. वाहने जपून चालवा. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना हा कालावधी विशेष चांगला असेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आपल्या आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, षष्ठात गुरु, केतू व प्लुटो, सप्तमात रवि, बुध व शनि अष्टमात शुक्र, नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. जोडीदाराची तब्येत सांभाळावी. जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. जोडीदाराला गृहित धरु नका. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. मात्र स्वत:च्या तब्येतीला जपावे असे ग्रहमान सांगत आहे. विशेषत: मधूमेह किंवा यकृताची काही दुखणी असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ/ वरीष्ठांची शाबासकी/ मान सन्मानाची प्राप्ती शक्य आहे. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात गुरु, केतू व प्लुटो, षष्ठात रवि, बुध व शनि सप्तमात शुक्र, नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या व जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवू शकतील. पाय/ पाठ/ गॅसेस/ संधीवाताचा त्रास असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात ज्योतिषी/ इतिहासकार/ सर्जन/ मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना काळ चांगला आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय यश मिळणार नाही. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासयोग संभवतात. वास्तुखरेदीसाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात मंगळ, चतुर्थात गुरु, केतू व प्लुटो, पंचमात रवि, बुध व शनि षष्ठात शुक्र, नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत दिवस मजेत जाणार आहे. मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे २ दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा काळ नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकूल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. वाहने जपून चालवावीत.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात गुरु, केतू व प्लुटो, चतुर्थात रवि, बुध व शनि पंचमात शुक्र, नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत घरात छान वातावरण असेल. नंतरचे २ दिवस विद्यार्थ्यांना, कलाकारांना व खेळाडूंना खुप चांगले आहेत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी आणि भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबाबत चांगली बातमी कळेल. घरात छान पार्टीचे आयोजन करा.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ धनस्थानी गुरु, केतू व प्लुटो, तृतिय स्थानात रवि, बुध व शनि चतुर्थात शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
आठवडा छान असणार आहे. आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. लेखक/ ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील मात्र प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. आपल्या छंदालाही जरुर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. डोकेदुखी, मायग्रेन/ अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही व्याधी असतील तर काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, केतू व प्लुटो, धनस्थानी रवि, बुध व शनि तृतियस्थानात शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग आहेत. लेखक, कवी, साहित्यिक यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. एखाद्या समारंभात भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या/ घरातील वस्तुंच्या सुशोभिकरणासाठी/ दुरुस्तीसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांना मात्र प्रतिकूल कालावधी आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध व शनि धनस्थानी शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, लाभस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी गुरु, केतू व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना धनलाभाची शक्यता आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहायला मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या छानशा हॉटेलला भेट द्याल. सप्ताह मध्यात भावंडांशी/ शेजार्‍यांशी वाद टाळा. प्रवास शक्यतो या काळात टाळलेले बरे. मात्र परदेशगमनासाठी हा योग चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. मित्रांच्या भेटी आनंद देतील. गृहसजावटीसाठी छानशी खरेदी करायला हरकत नाही.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, दशमस्थानी मंगळ, लाभस्थानी गुरु, केतू व प्लुटो आणि व्ययस्थानी रवि, बुध व शनि अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. एखादा अनावश्यक खर्चही करावा लागु शकतो. त्यानंतरचे दोन दिवस मन प्रसन्न असेल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य लाभदायक असेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मौज मजा करण्याकडे कल असेल. जुने मित्र भेटतील. ऒळखीमुळे काही अडकलेली कामे सहजगत्या होतील. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी गुरु, केतू व प्लुटो, लाभस्थानी रवि, बुध व शनि आणि व्ययस्थानी शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राची नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची शुक्राशी व नेपचूनशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ छान आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकतील. काही लाभही होऊ शकतात. त्यानंतरचे २ दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य लाभदायक घटनांचा असू शकतो. सप्ताह अखेरीस लांबच्या प्रवासाचे बेत ठरवाल. गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे मात्र आपली मते दुसर्‍यांवर लादू नका.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अ‍ॅस्ट्रोशोध#भविष्य#ज्योतिषी