अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१९)  

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषत: सर्दी किंवा थंडीमुळे होणार्‍या आजारांपासून जपायला हवे. शत्रुंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपले वरीष्ठ नाराज होणार नाहेत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांही प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काही विचित्र अनुभव येऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. काहींना अचानक धनलाभ शक्य आहेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात रवि, मंगळ, बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सोमवार दुपारपर्यंतचा काळ विद्यार्थी व कलाकारांना चांगला आहे. संततीकडून सुवार्ता कळतील. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी हा काळ खुप छान आहे. मात्र त्यानंतरचे २/३ दिवस आरोग्याच्या समस्या जाणवतील. डोळे/ दात/ सर्दी याबाबत काही समस्या या काळात जाणवतील. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत ना याची काळजी घ्या. खाण्यापिण्याबाबतही या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना लाभदायक काळ आहे मात्र बेकायदा कोणतेही व्यवहार करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. केलेल्या श्रमाचं चीज होईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळल्यास अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात रवि, मंगळ, बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सप्ताह मध्य घरातील वातावरण प्रसन्न असेल. एखादा पार्टीचा किंवा मेजवानीचा कार्यक्रम घरात ठेवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री करणार्‍या व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठी अनुकूल काळ आहे.
काहींना हा काळ विशेष भाग्यवर्धक आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, मंगळ, मंगळ, बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. घरासंबंधी काही कामे असतील तर आता करुन घ्यावीत. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिक कामासंबंधीत केलेले प्रवासयोग लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे य़ोग येतील किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण छान असेल. पती/ पत्नीला जरुर वेळ द्यावा. आपल्या एखाद्या छंदासाठीही जरुर वेळ द्या. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. भावंडांच्या/ नातलगांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. सप्ताहाच्या शेवटी वादग्रस्त लिखाण टाळावे. प्रवास करणार असाल तर प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. कुणाशीही वाद होणार नाहीत म्हणून जपा. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद टाळावेत. परदेशगमनासाठी मात्र चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस आप्तेष्टांच्या भेटी होतील. लेखकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना मस्त धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. आपल्या जिवलगांबरोब्रर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी घरासाठी वेळ काढावा लागेल. काही चिंता सतावत रहातील. दगदग कमी करा. थोडी विश्रांतीही घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात रवि, मंगळ, बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. वरीष्टांचं आपल्याला चांगलं सहकार्य लाभणार आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे अचानकपणे होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. लेखक, कलाकार, यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामासाठी वेळ काढावा लागेल. गृहसजावटीसाठी छानशी खरेदी करायला हरकत नाही.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात रवि, मंगळ, बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींना मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. सप्ताह मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोगही संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर
आपल्या कामात दुर्लक्ष होऊ देऊ नका अन्यथा वरीष्टांच्या नाराजीचे योग आहेत. गूढ गोष्टींकडे मन आकर्षित हॊईल. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रामध्ये पुन्हा चांगले काम होणार आहे. जुने मित्र भेटतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्र व बुध यांची युती होईल. ३ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल आणि ५ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांअगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. चैन करावीशी वाटेल. विमा व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. विवाहोत्सूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने जपून चालवावीत. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group