अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०१९)

श्री गजाननाचे व गौरींचेही आगमन या सप्ताहात होणार आहे. त्यांना प्रथम नमन करुया. गौरी व गणपतीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृध्दी, आनंद येवो. सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होवो ही प्रार्थना करुन साप्ताहिक भविष्याला सुरुवात करतो.  

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवत रहातील. वकील, आहारतज्ञ, केमिस्ट व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना मात्र हा काळ चांगला आहे. आपल्या मुलांशी वाद टाळावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, बुध, शुक्र व मंगळ, सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. विवाहोच्छूकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सर्दी, दात किंवा घशासंबंधी काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ, षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना काळ अनुकूल आहे.
सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखं वाटेल. कवी, लेखक, ब्लॉगर्स यांनी या काळात केलेल्या कामाची दखल लोक नक्की घेतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. गुप्त शत्रूंच्या कारवाया त्रास देतील. काळजी घ्यावी.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ, पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला व लाभदायक जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. प्रवास लाभदायक ठरतील.  भावंडांच्या भेटीचे योग येतील किंवा त्यांची खुशाली कळेल. शेजार्‍यांचा एखादा चांगला अनुभव येईल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण उत्सव समारंभाचे रहाणार आहे. घरात छान खरेदी करा. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त जवळचे प्रवास शक्य. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे. काहींना डोकेदुखी किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास या काळात जाणवू शकतो. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची ठरेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. कलाकारांसाठी हा काळ खुप चांगला आहे. प्रॉपर्टीच्या कामास चांगला आहे. एखाद्या कामात चांगला लाभ संभवतो. सप्ताह अखेर लेखक/ खेळाडू यांना चांगला आहे. भावंडांकडून भेटवस्तु मिळतील. सहल किंवा प्रवासासाठी हा काळ चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि लाभस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. जुने मित्र किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य. संततीसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण सप्ताहात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटीगाठीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. मस्त पार्टीचे योग संभवतात. परदेशगमन करण्यास अनुकुल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. कार्यालयीन कामानिमित्त काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी करु नये. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, अष्टमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात वरीष्ठ खूष असतील. भागीदारीत व्यवसाय ज्यांना सुरु करायचा आहे त्यांना ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. वाहने जपून चालवावीत. गुढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, सप्तमस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवात संमिश्र असणार आहे. काही मनाविरुध्द घटना तर काही तुमच्या कष्टाला दाद देणार्‍या घटना संभवतात. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ/ सर्जन यांना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे योग शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, षष्ठात रवि, बुध, शुक्र व मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ तारखेला रविची मंगळाशी युती होईल. ४ रविची बुधाशी युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
सप्ताह संमिश्र जाणार आहे. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे तसेच जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ नाही. व्यवहार पारदर्शी ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. आरोग्यासंबधी काही तक्रारीही जाणवू शकतील. मात्र सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे. संपूर्ण सप्ताह वाहने जपून चालवावीत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group