अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१९)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात बुध, पंचमात रवि, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सोमवार, मंगळवार भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवास छान फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार/ आर्टीस्ट यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खुप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, तृतिय स्थानात बुध, चतुर्थात रवि, शुक्र व मंगळ, सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल काळ आहे. घराच्या सजावटीसाठी खरेदी कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सुर शेवटपर्यंत टिकणार आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, व्दितिय स्थानात बुध, तृतिय स्थानात रवि, शुक्र व मंगळ, षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
रविवारी मनासारखी खरेदी होईल. बोलण्यावर संयम ठेवावा. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. नृत्यकलेशी संबंधितांना मात्र हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. नंतरचे चार दिवस धनलाभाचे आहेत. मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्य शेवटी शेजारी रहाणार्‍यांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील. अ‍ॅसिडिटी किंवा पोटासंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, व्दितिय स्थानात रवि, शुक्र व मंगळ, पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या गाठीभेटीचे योग शक्य आहेत. मित्रांकडून काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. सप्ताह अखेरीस छान कालावधी आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र व मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानात बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खूश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू, लाभस्थानी बुध आणि व्ययस्थानात रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना वरीष्ठांकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ चांगला आहे. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडॆ लक्ष द्यावे. काहींना धनलाभ संभवतात. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
उपासना: श्रीराम किंवा विष्णू उपासना या काळात जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी बुध आणि लाभस्थानी रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतात. जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधीतांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू, भाग्यस्थानी बुध आणि रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्‍यांना तसेच लेखक व कवी यांना अनुकूल काळ आहे. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांची मर्जी राखावी लागेल. कलाकारांना चांगला काळ आहे. तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमात बुध, भाग्यस्थानी रवि, शुक्र व मंगळ आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली संधी मिळू शकते.
भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला गृहीत धरु नका. जोडीदाराशी रुसवे फ़ुगवे जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काही लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, सप्तमस्थानी बुध, अष्टमात रवि, शुक्र व मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस मजेत जाणार आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त आऊटींगला जायला हरकत नाही. कलाकारांना छान कालावधी आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. काही विचित्र अनुभव शक्य आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात बुध, सप्तमस्थानी रवि, शुक्र व मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी मात्र प्रतिकूल काळ आहे. वादाचे प्रसंग टाळावे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवा.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, पंचमात बुध, षष्ठात रवि, शुक्र व मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राची युती मंगळ, बुध व शुक्राबरोबर होईल. ३१ तारखेला चंद्राचा प्लुटोशी त्रिकोण होईल.
रविवारी छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. लेखकांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. सोमवार, मंगळवारी भावंडांशी वाद टाळावे. सप्ताहाच्या मध्यात काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतील. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची कामे करणार्‍यांना लाभदायक काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही हा काळ चांगला आहे. काही भग्यवर्धक गोष्टीही या दरम्यान शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group