अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९)    

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात बुध, पंचमात रवि, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. काहींना विचित्र अनुभव येऊ शकतात. वाहने सावकाश चालवावीत. सरकारी यंत्रणेकडून त्रासदायक अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. कुटुंबीय किंवा जिवलगांसमवेत वेळ मजेत जाऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, तृतिय स्थानात बुध, चतुर्थात रवि, शुक्र व मंगळ, सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना जास्त अनुकूल काळ आहे. सर्जन, ज्योतिषी, इंशूरन्ससंबंधी काम करणारे व मानसोपचारतज्ञ यांनासुध्दा अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. घरगुती वस्तुंच्या दुरुस्ती किंवा सुशोभिकरणासाठी खर्च संभवतो. सप्ताह अखेरीस कार्यक्षेत्रात छान काम घडेल त्यामुळे मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, व्दितिय स्थानात बुध, तृतिय स्थानात रवि, शुक्र व मंगळ, षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात आपल्या कामात दुर्लक्ष करु नका. वरीष्ठ नेमके तुमच्या चुका काढण्याची शक्यता आहे. हितशत्रुंकडॆ लक्ष ठेवावे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. नोकरीबदल करण्यासाठी मात्र चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. प्रवासयोग येतील. मात्र प्रवासात काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, व्दितिय स्थानात रवि, शुक्र व मंगळ, पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होतील. मन प्रसन्न करणार्‍या घडतील. एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून पुर्ण सहकार्य मिळेल. कलाकारांना विशेषत: गायकांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेरीस मित्रांबरोबर मस्त पार्टीचे बेत ठरवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. घरातील वातावर्ण प्रसन्न रहाणार आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र व मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानात बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नाही. घरातील शांतता आपल्या वागण्या बोलण्याने भंगणार नाही याची काळजी घ्यावी. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. लेखक/ ब्लॉगर्स/ कलाकार यांना अनुकुलता जाणवेल. काहींना प्रवासयोग संभवतात. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू, लाभस्थानी बुध आणि व्ययस्थानात रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विवाह ठरविण्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य. प्रवासयोग संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी बुध आणि लाभस्थानी रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वकिलांना व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना हा काळ चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनाही चांगले योग आहेत. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या सहवासात वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना अनुकूल कालावधी आहे.  सप्ताह अखेरीस एखादी मनाविरुध्द घटना शक्य.
उपासना: या काळात सुर्याची किंवा गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू, भाग्यस्थानी बुध आणि रवि, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर विसेष काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. प्रॉपर्टीची कामे लांबण्याची शक्यता आहे. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत
मस्त खरेदीला जाण्यासाठी अनुकुल आहे.
उपासना:  गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमात बुध, भाग्यस्थानी रवि, शुक्र व मंगळ आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. घराच्या डागडुगीसाठी किंवा सजावटीसाठी काही खर्च करावे लागतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व लेखक यांना अनुकूल आहे. प्रवासयोग शक्य. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. धनलाभाचीही शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, सप्तमस्थानी बुध, अष्टमात रवि, शुक्र व मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल.  १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. मित्रांच्या किंवा आवडत्या माणसांबरोबर वेळ छान जाईल. लेखक, ब्लॉगर यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांसाठीही लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात घरात मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यवी. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. गुढ गोष्टींकडे कल वाढेल. सप्ताह अखेरीस घरातील वडीलधारी व्यक्तींची काळजी घ्यावी. ह्रदयरोग असणार्‍यांनी पथ्य सांभाळावे. मन शांत ठेवावे.
उपासना:  विष्णू उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात बुध, सप्तमस्थानी रवि, शुक्र व मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
पुर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे त्यामुळे खुशीत असाल. वरीष्ठांचीही चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. काहींना धनलाभ शक्य. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स तसेच प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, पंचमात बुध, षष्ठात रवि, शुक्र व मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र व मंगळाची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना संभवतात. सप्ताह मध्यात अचानक काही खर्च करावे लागतील. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. आपल्या बोलण्याने कुणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सोशल मिडियावर लेखन करतांना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group