अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१९)        

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, बुध व शुक्र, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना हा काळ चांगला आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करीत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्य चांगला जाईल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताह अखेरीस संमिश्र घटना शक्य. वाहने जपून चालवा. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, मंगळ, बुध व शुक्र, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू/ प्रमोशन/ पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. घसा किंवा पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. भागीदारीतल्या व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. छान प्रवासयोग संभवतात. लेखक, कवी, साहित्यिक यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, व्दितिय स्थानात रवि, मंगळ, बुध व शुक्र, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. मात्र काही कायदेशीर कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. कागदपत्रे तज्ञांना दाखवून मगच व्यवहार करा. सप्ताह मध्य विद्यार्थी, कलाकार व लेखकांना चांगला जाईल. केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखं वाटेल. सप्ताहाच्या शेवटी अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास होऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. पाणी उकळून प्यावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, बुध व शुक्र, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांच्या भेटीचे योग येतील किंवा त्यांची खुशाली कळेल. लेखक, कवी, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण उत्साहाचे व आनंदाचे रहाणार आहे. एखाद्या पार्टीचे किंवा गेट टुगेदरचे आयोजन तुम्ही करायला हरकत नाही. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकुल काळ आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, बुध व शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग येतील. छान मेजवानीचेही योग येतील. मात्र या काळात आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाहीत याची जरुर दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त प्रवास शक्य आहेत. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. पॉपर्टीचे व्यवहार मात्र या काळात न केलेलेच बरे. कुठल्यातरी गोष्टीची काळजी किंवा हुरहुर विनाकारण लागून राहील.
उपासना: कृष्णाची उपासना किंवा विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताह चांगला आहे. पूर्ण सप्ताहभर काही लहानमोठे लाभाचे प्रसंग येत रहातील. काहींना प्रवासयोग येतील. भावंडांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवायला मिळेल. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. लेखक, खेळाडू व कलाकारांसाठी हा काळ खुप चांगला आहे. वरीष्ठांकडे प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी शब्द टाकायचा असेल तर हा उचित काळ आहे. सहल किंवा प्रवासासाठीही हा काळ चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि दशमस्थानी रवि, मंगळ, बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहे त्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आपल्या कार्यक्षेत्रात भरपूर व मनासारखं काम कराल. त्याच्यातून लाभही चांगले होतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य. मात्र खाण्यापिण्याबाबत संयम बाळगावा. डोळ्याचे काही त्रास असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि भाग्यस्थानी रवि, मंगळ, बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. काही मनाविरुध्द खर्चही करावे लागू शकतात. मात्र हा केलेला खर्च भविष्यात एखादा लाभ मिळवून देणारा ठरु शकेल. परदेश प्रवासाचे योग संभवतात. उपासना करण्यार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना घडतील. रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमात रवि, मंगळ, बुध व शुक्र, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. गूढ विषयांकडे मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. या पूर्ण सप्ताहात धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी करु नये. वाहने जपून चालवावीत. कोणाशीही वाद चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
उपासना: कालभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, बुध व शुक्र, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होतील. उपासना करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताह मध्यात वरीष्ठांना खूष ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. सहकार्‍यांशी वाद टाळावेत. मात्र भागीदारीतील व्यावसायिकांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांनाही लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात रवि, मंगळ, बुध व शुक्र, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाची सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. तब्येतीच्या काही तक्रारी या सप्ताहात जाणवतील. विशेषत: सर्दी/ कफ़/ खोकला याचा त्रास संभवेल. पावसात भिजणे टाळा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, पंचमात रवि, मंगळ, बुध व शुक्र, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला मंगळाचा प्लूटोशी षडाष्टक होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला मंगळ सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमी जीवांना हा कालावधी विशेष चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवा. कुठलेही नियम मोडू नका. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना चांगले ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तिची भेट होईल. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध