अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ जून ते २९ जून)               

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, व्दितिय स्थानात शुक्र, तृतिय स्थानात रवि, राहू, चतुर्थात मंगळ, बुध, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये मन रमेल. प्रवासाचे योग काहींना संभवतात. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी चांगला काळ आहे. नृत्यकला, ज्योतिष तसेच विमा संबंधी कामे करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. खर्च करतांना थोडं भान या काळात ठेवणं गरजेचं आहे. सप्ताह मध्यानंतर घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही प्रलंबित कामे असल्यास त्यांना प्राधान्य द्या. सप्ताहाच्या अखेरीस एखादा धनलाभ शक्य आहे. गायक, वक्ते यांना छान लाभाचा काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, व्दितिय स्थानात रवि, राहू, तृतिय स्थानात मंगळ, बुध, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात विरोधी परीस्थितीचा सामना करावा लागू शकेल. कामात दिरंगाई किंवा चुका होणार नाहीत तसेच वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गूढ विषयांचं आकर्षण वाटत राहील. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. भागीदारीतल्या व्यवसायातून लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर बेकायदा व्यवहारापासून लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. भावंडांशी वाद टाळा. परदेशगमनासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न असेल. अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात रवि, राहू, व्दितिय स्थानात मंगळ, बुध षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या हितशत्रूंकडे लक्ष ठेवा. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र अनुकूल कालावधी आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादी कौतुकाची थाप/ एखादं बक्षिस किंवा एखादा धनलाभ शक्य. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रेमिकांना काही मंतरलेले क्षण अनुभवता येतील. खरेदीसाठी छान काळ आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील. गणपतीचे दर्शन रोज घेता आले तर जास्त छान.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानी रवि, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. त्वचा,  वातविकार किंवा हाडांसंबधी काही त्रास जाणवू शकतील. सप्ताह मध्यात भाग्यकारक घटना शक्य आहेत. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा अचानक मिळालेली पगारवाढ थक्क करु शकेल. अध्यात्म, न्यायक्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर छान काम केल्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल दशमस्थानी शुक्र, लाभस्थानी रवि, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यानंतर प्रवास करणार असाल तर काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक. आपल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी कराल. लाभदायक काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल भाग्यस्थानी शुक्र आणि दशमस्थानी रवि, राहू लाभस्थानी मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. ईंशुरन्स संबंधी कामे करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत. लाभदायक कालावधी आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.

उपासना: मारुतीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, अष्टमात शुक्र, भाग्यस्थानी रवि, राहू आणि दशमस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र काळ आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र  काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमात रवि, राहू आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात उत्सव, समारंभ, चैन, मौजमजा यांनी भरलेली असेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. शिक्षणासठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. नविन गुंतवणूकीसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात शुक्र सप्तमस्थानी रवि, राहू, अष्टमात मंगळ, बुध, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र खूप चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांशी वाद टाळावेत. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि, राहू, सप्तमस्थानी मंगळ, बुध, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही खर्च करावे लागू शकतील. डोळ्यांची काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा. सप्ताह मध्यात छान लाभ होतील. लेखक, वक्ते व कवी यांच्यासाठी चांगला असेल. भावंडांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. सप्ताह मध्यानंतर भागिदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांसाठी चांगला कालावधी आहे. प्रेमिकांना छान काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी शुक्र, पंचमात रवि, राहू, षष्ठात मंगळ, बुध, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. मन आनंदी असेल. जुने मित्र भेटतील. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आपल्याला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव सप्ताह मध्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. त्यामुळे आपले वरीष्ठ व सहकारी आपल्यावर खुश असतील. सप्ताह मध्यानंतर भावंडांशी/ शेजार्‍यांशी वाद टाळावेत. वादग्रस्त लिखाणही टाळावे. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या संबंधित काही तक्रारी या कालावधीत आपल्याला जाणवतील काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी रवि, राहू, पंचमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला गुरु शुक्र प्रतियोग होईल,  २४ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल, २७ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २८ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनासारखी खरेदी होईल. अचानक उद्भवलेल्या एखादा खर्चही करावा लागू शकतो. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक काळ आहे. खेळाडू, कलाकार व विध्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस भावंडांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबीयांसमवेत वॆळ छान व्यतीत होईल. प्रवासाचेही योग येतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध